Yash Birthday : केजीएफ (KGF) चित्रपटापासून प्रसिद्ध झालेला सुपरस्टार यशचा आज 35 वा वाढदिवस आहे. यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी झाला. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याचे वडील अरुण कुमार कर्नाटक परिवहन सेवेत चालक आहेत तर, आई पुष्पा गृहिणी आहेत. यशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मोग्गीना मनसू (2008) चित्रपटामधून केली होती. यशने राजधानी, मिस्टर अँड मिसेस रामाचारी आणि किरतका सारखे चित्रपट केले असले तरी, त्याला खरी प्रसिद्धी केजीएफ चित्रपटापासून मिळाली. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या.


यशने अशोक कश्यप दिग्दर्शित 'नंदा गोकुळा' या टेलिव्हिजन मालिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत यश 'रॉकींग स्टार' या नावाने ओळखला जातो. त्याचा 'गुगली' हा चित्रपट कन्नड इन्डस्ट्रीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. यशला नाव मिळवून दिलं ते 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस रामाचारी' या चित्रपटाने. 2018 मध्ये रिलीज झालेला KGF हा कन्नड सिनेमातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींचा गल्ला जमवला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यश एक प्रसिद्ध चेहरा बनला. यशच्या आगामी 'KGF: Chapter 2' चित्रपटाची देशभर प्रतीक्षा आहे.


यश सुमारे 50 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. यशचा बंगळुरूमध्ये सुमारे चार कोटी रुपयांचा आलिशान बंगलाही आहे. यशने गेल्या वर्षीच दुसरे घर घेतले. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'त्यांचे वडील अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. यश सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. 2017 मध्ये त्यांने 'यश मार्ग फाउंडेशन' सुरू केले. या फाऊंडेशनने कोप्पल जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्चून एक तलाव बांधला आहे, ज्यातून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha