मुंबई : दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांना कोरोनाची  (COVID-19 Positive) लागण झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली. "माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी दोन्ही लशी घेतल्या आहेत. परंतु, कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्या. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे असे सांगत कोरोना नियांचे सर्वांनी पालन करा, असे आवाहन भांडारकर यांनी केले आहे. 


मधुर भांडारकर यांनी आपल्या ट्विटरवरून  याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, देशभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने  वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. देशातील सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत.





 
मुंबईतही कोरोना रूग्णांध्ये वाढ होत आहे. कोरोनाने राजकीय मंडळी आणि बॉलिवूड कलाकारांभोवती विळखा घट्ट् केला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील 14 मंत्री आणि विविध राजकीय पक्षातील जवळपास 80 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बॉलिवूडमध्येही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मागच्या महिन्यात करण जोहरने आयोजित केलेल्या डिनर पार्टीत सहभागी झाल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता आरोरा यांच्यासह आणखी सात ते आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती. 


अभिनेत्री मिथिला पालकरला कोरोनाची लागण
अभिनेत्री मिथिला पालकरलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. 


या आधी कोरोना बाधित झाले 'हे' कलाकार
दरम्यान, या आधीही बॉलिवूडमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. विशाल ददलानी, वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' अभिनेत्री कुब्रा सैत, स्वरा भास्कर, अभिनेत्री, गायिका आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती, साऊथ सुपरस्टार महेश बाबू, एकता कपूर, दृष्टी धामी, शिल्पा शिरोडकर, अर्जुन कपूर, अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एकता कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे, सध्या ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली असून आता त्याच्या मुलाला आणि पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगमलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. 


महत्वाच्या  बातम्या