Mithila Palkar : अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याचं समोर आलं आहे. तिने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. 'कारवां' (Karwaan) फेम अभिनेत्री मिथिला पालकरने सांगितले की, तिच्या वाढदिवसापूर्वीच तिला कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये असून स्वतःची काळजी घेत आहे.


मिथिलाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ''मी माझ्या वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात कोरोनाची लागण  होऊन झाली आहे. मला सौम्य लक्षणे होती. मी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. मी खूप सावधगिरी बाळगते. विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या संपर्कात येण्यापासून टाळत आहे. तुम्ही मास्क घाला आणि सुरक्षित रहा.''


याआधी विशाल ददलानी, वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' अभिनेत्री कुब्रा सैत, स्वरा भास्कर, अभिनेत्री, गायिका आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती, साऊथ सुपरस्टार महेश बाबू, एकता कपूर, दृष्टी धामी, शिल्पा शिरोडकर, अर्जुन कपूर आणि इतर अनेक स्टार्स कोरोनाने ग्रासले आहेत. याचा फटका बसला आहे आणि सध्या हे स्टार्स होम क्वारंटाईनमध्ये कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देत आहेत.


अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल तसेच अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एकता कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे, सध्या ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली असून आता त्याच्या मुलाला आणि पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगमलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha