एक्स्प्लोर
उत्तम मराठी बोलणारा अक्षय कुमार आज 'चला हवा येऊ द्या'मध्ये
मुंबई: अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि इरफान खान यांच्यानंतर आता अक्षय कुमारनेही त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'चं दार ठोठावलं.
आगामी रुस्तम या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमारने 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये हजेरी लावली. आज या स्पेशल एपिसोडचं शुटिंग होत आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
'चला हवा येऊ द्या' या शोला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. महाराष्ट्रतल्या घराघरात पोहोचण्यासाठी हक्काचं माध्यम म्हणून या शो कडे पाहिलं जातं. त्याच गोष्टीचा फायदा बॉलिवूडची मंडळी उचलत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. नुकतंच सलमान खाननेही सुलतानच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये उपस्थिती लावली होती.
टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अक्षयसोबत एलियाना डिक्रूझ प्रमुख भूमिकेत आहे.
अक्षय चांगलं मराठी बोलू शकतो हे सगळ्यांनाच माहित आहे. शिवाय त्याच्या खेळकर वृत्तीमुळे कार्यक्रमात धम्माल करेल यात शंकाच नाही.
संबंधित बातम्या
शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये
चाहे प्यादा कुर्बान हो या रानी, 'रुस्तम'चा ट्रेलर लाँच
‘मैं कमांडर रुस्तम पावरी, इंडियन नेव्ही’, अक्षयकडून ‘रुस्तम’च्या ट्रेलरची हटके घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement