Akshay Kumar Mission Raniganj For Oscars 2024 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj) हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता या सिनेमाचे निर्माते 'ऑस्कर 2024'साठी (Oscars 2024) सिनेमाची एन्ट्री पाठवणार असल्याचे समोर आले आहे. 


'मिशन रानीगंज' या सिनेमाला ऑक्सर मिळावं यासाठी निर्मात्यांनी स्वतंत्रपणे ऑस्कर अकादमीसाठी सिनेमा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या सिनेमाला कोणत्या कॅटेगरीत नामांकन मिळणार हे जाणून घेण्यासाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. 






'मिशन रानीगंज' या सिनेमाला 'ऑस्कर 2024'मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळू शकतं असे म्हटले जात आहे. 'मिशन रानीगंज' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टीनू देसाईने सांभाळली आहे. या सिनेमाआधी अक्षय आणि टीनूने 'रुस्तम' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमासाठी खिलाडी कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 


'मिशन रानीगंज'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी (Mission Raniganj Box Office Collection)


'मिशन रानीगंज' या सिनेमात जसवंत सिंह गिल यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 6 ऑक्टोबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 2.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 4.8 कोटी, तिसऱ्या दिवशी पाच कोटी, चौथ्या दिवशी 1.5 कोटी, पाचव्या दिवशी 1.5 कोटी, सहाव्या कोटी 1.35 कोटी, सातव्या दिवशी 1.3 कोटी, आठव्या दिवशी पाच कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या आठ दिवसांत या सिनेमाने 23.25 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'मिशन रानीगंज'बद्दल जाणून घ्या...


'मिशन रानीगंज' हा सिनेमा 1998 मधील एका घटनेवर आधारित आहे. पश्चिम बंगालमधील रानीगंज या भागात कोळसा खाणीत काही मजूर अडकले होते. या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर जसवंत सिंह गिल यांनी या खाणीत अडकलेल्या 65 लोकांचे प्राण वाचवले. याच जसवंत सिंह गिल यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.


संबंधित बातम्या


Mission Raniganj Review: अक्षयने मांडली रिअल लाईफ हिरो जसवंत सिंह गिल यांची कहाणी; कसा आहे 'मिशन रानीगंज'? वाचा रिव्ह्यू