Mission Raniganj Review: काही चित्रपट असे असतात ज्यांची कथा जाणून घेणे महत्वाचे आसते. कारण ती कथा  खरी असते. ती कथा आपल्या देशाच्या  रिअल लाईफ हिरोंची असते. मिशन रानीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू  (Mission Raniganj: The Great Bharat Rescue) हा अशाच  कथेवर आधारित असणारा एक चित्रपट आहे. 


चित्रपटाची कथा


मिशन रानीगंज  या चित्रपटाची कथा ही रानीगंज येथील आहे,  जिथे कोळशाच्या खाणीत अपघात होतो आणि 65 मजूर तिथे अडकतात. ते मजूर कुठे आहेत? ते जिवंत आहेत की नाही? याबाबत कोणालाच माहिती नव्हते. खाखाणीत पाण्याची पातळी वाढत आहे. विषारी वायू येत होते. अशा परिस्थितीत, खाण अभियंता जसवंत सिंह गिल हे मजूरांना वाचवण्यासाठी एक प्लॅनकरतात आणि ते स्वतः खाणीत जातात. जगात कुठेही आणि कधीही न घडलेली ही बचाव मोहीम सुरु होते. त्यात जसवंत सिंह गिल स्वतः शेवटी  खाणीमधून बाहेर येतात. ही एक खरी कहाणी आहे जी आपण सर्वांनी जाणून घेतली पाहिजे. 


कसा आहे चित्रपट?


मिशन रानीगंज हा एक अप्रतिम चित्रपट आहे. चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो. तुम्ही त्या बचाव मोहिमेचा एक भाग बनता. खाणीत अडकलेल्या मजुरांच्या वेदना तुम्हाला चित्रपट बघत असताना जाणवतात. त्यांच्या कुटुंबियांसोबत तुम्हालाही त्रास होतो.  या मिशनमध्ये पुढे काय होणार आहे? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता राहते. कोळसा खाणीची दृश्ये ज्या प्रकारे दाखवली गेली आहेत चित्रपटात, ते अप्रतिम आहे.या चित्रपटाचं शूटिंग लंडनजवळ  झाले होते आणि तेथे एक संपूर्ण कोळशाची खाण तयार करण्यात आली होती.    ती खाण खऱ्या खाणीसारखी दिसते. या 65 लोकांपैकी प्रत्येकजण खाणीमधून बाहेर येतो. पण जेव्हा शेवटी जेव्हा सर्व कामगार बाहेर आल्यानंतर जसवंत सिंहगिल बाहेर येतात तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवतात.


कलाकारांचा अभिनय


अक्षय कुमारने अप्रतिम काम केले आहे.  त्याच्या देहबोलीपासून ते डायलॉग डिलिव्हरीपर्यंत सर्व काही परफेक्ट आहे. बाकी सर्व कलाकारही लाजवाब आहेत आणि चित्रपटात एकापेक्षा एक अभिनेते आहेत.


कुमुद मिश्रा यांनी अक्षयच्या बॉसची भूमिका साकारली आहे.ते एका नव्या लूकमध्ये दिसले आहेत आणि त्यांनी अप्रतिम काम केले आहे.पवन मल्होत्राने देखील चांगले काम केले आहे.रवी किशनने खाणीत अडकलेल्या मजुराची भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये परिणीती चोप्राने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका छोटी आहे पण तिनं ती अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारली आहे.


दिग्दर्शन 


टिनू सुरेश देसाई यांनी चांगल्या पद्धतीनं चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटावरची त्यांची पकड सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिसते. त्यांनी ज्या पद्धतीने अनेक अप्रतिम अभिनेते घेऊन  चित्रपट तयार केला आहे,  ते अतिशय उत्तम आहे. फक्त एक चांगला दिग्दर्शक हे करू शकतो. 


संगीत 


चित्रपटाचे संगीत देखील चांगले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीचे गाणे थोडे खुपते पण गाणे छान आहे. या चित्रपटामधील 'जीतेंगे' हे गाणे कुमार विश्वास यांनी लिहिले आहे आणि ते अप्रतिम वाटते.


 एकंदरीत चित्रपटात आपल्या देशाच्या अशा रिअल लाईफ हिरोची कथा आहे जी आपल्याला माहित नव्हती. ही कथा आपल्याला माहित असावी, म्हणून हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे.