National Cinema Day 2023:  आज  देशात राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day  2023) साजरा केला जात आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त सिनेप्रेमींसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. प्रेक्षक आज थिएटरमध्ये 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहेत. अशातच राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त जाणून घेऊयात अशा मराठी गाण्यांबद्दल ज्यांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले आणि प्रेक्षकांना थिरकायला लावलं.


बाई पण भारी देवा (Baipan Bhaari Deva)


केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बाईपण भारी देवा'   या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कथानकानं आणि चित्रपटांमधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. पण या चित्रपटामधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अनेक महिलांनी बाई पण भारी देवा चित्रपटाच्या टायटल साँगवर व्हिडीओ बनवले. तसेच सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये दिसले की, महिला या थिएटरमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या टायटल साँगवर तसेच या चित्रपटातील मंगळागौर या गाण्यावर डान्स करत आहेत. 






झिंगाट (Zingaat)


नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा  2016 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटामधील गाणी आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. या चित्रपटामधील झिंगाट या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. थिएटरमध्ये सैराट पाहताना झिंगाट गाणं लागलं की प्रेक्षक थिरकायला सुरूवात करत होते. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी सैराट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.



वेड लावलंय  (Ved Lavlay)


वेड या रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील वेड लावलंय या गाण्यावर अनेकांनी डान्स केला. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दिसले की, वेड लावलंय या गाण्यातील सलमान खान आणि रितेशच्या स्टेप्ससारख्या स्टेप्स करुन प्रेक्षक डान्स करत आहेत.


 


इतर महत्वाच्या बातम्या: 


National Cinema Day 2023: आज आहे राष्ट्रीय चित्रपट दिन; शाहरुखचा 'जवान' ते अक्षयचा 'मिशन रानीगंज', 99 रुपयांत पाहा 'हे' चित्रपट