Hrithik Roshan Metro : मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वेळ वाया जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटींनादेखील या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. अभिनेता हृतिक रोशननेदेखील (Hrithik Roshan) ट्रफिकला कंटाळून मेट्रोने प्रवास केला आहे. 


अभिनेत्री हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वी मेट्रोने प्रवास केला होता. आता हृतिक रोशननेदेखील मेट्रोने प्रवास केला आहे. हृतिक मेट्रोत आल्याचे पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अभिनेत्यानेही कोणाला निराश न करता सर्वांसोबत संवाद साधत फोटो काढले. शूटिंगला जाण्यासाठी अभिनेत्याने मेट्रोने प्रवास केला आहे. 


हृतिकने शेअर केले फोटो (Hrithik Roshan Shared Metro Ride Photo)


हृतिक रोशनने सोशल मीडियावर मेट्रोतील प्रवासादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तो वयोवृद्धांसोबतही आपुलकीने संवाद साधताना दिसत आहे. फोटो-व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे,"आज शूटिंगला जाण्यासाठी मेट्रो पकडली. या प्रवासात खूप गोड व्यक्तींची भेट झाली. त्या गोड व्यक्तींनी प्रेमाने माझी चौकशी केली. मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव खूपच कमाल होता. उष्णता आणि ट्रॅफिकला कंटाळून मी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला". 






हृतिक रोशन त्याच्या आगामी सिनेमातील अॅक्शन सीनचं शूट करण्यासाठी जात होता. अभिनेत्याने शेअर केलेल्या मेट्रो प्रवासातील पोस्टवर त्याची गर्लफ्रेंड सबा आझादनेही खास कमेंट केली आहे. तिने लिहिलं आहे,"प्रेम". हेअर डिझायनर आलम हकीमने लिहिलं आहे,"इंस्टाग्रामवरची आजही सर्वात छान पोस्ट". एका चाहत्याने लिहिलं आहे,"हे लोक एवढे शांत कसे काय आहे? मला तुम्ही भेटलात तर मी वेडाच होईल". 


हृतिकचे आगामी सिनेमे (Hrithik Roshan Upcoming Movies)


हृतिक रोशन सध्या 'फायटर' (Fighter) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'नवॉर 2' या सिनेमातही हृतिक झळकणार आहे.


संबंधित बातम्या


Saba Azad Trolled: 'दारु जास्त झाली का?'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल