Nysa Devgn: फोटोग्राफर्सनं नावाचा केला चुकीचा उच्चार; अजय -काजोलची मुलगी म्हणाली, 'माझं नाव...'
नुकताच निसाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निसा (Nysa Devgn) ही तिच्या नावाचा उच्चार कसा करायचे? हे फोटोग्राफर्सला सांगताना दिसत आहे.
Nysa Devgn: अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची मुलगी निसा देवगण (Nysa Devgn) ही तिच्या लूकमुळे चर्चेत असते. निसाचं नाव अनेकवेळा फोटोग्राफर्स न्यासा, निशा असं घेततात. नुकताच निसाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निसा ही तिच्या नावाचा उच्चार कसा करायचे? हे फोटोग्राफर्सला सांगताना दिसत आहे.
अभिनेता अजय आणि अभिनेत्री काजोलची मुलगी बॉलिवूडच्या अशा स्टार किड्सपैकी एक आहे ज्यांचे नाव अनेकांना गोंधळात टाकते. नीसाला फोटोग्राफर्स अनेकदा 'न्यासा, निशा' अशा नावानं हाक मारतात. निसानं पहिल्यांदाच तिच्या नावाबद्दल फोटोग्राफर्सला सांगितलं.
निसा ही तिचा बेस्ट फ्रेंड ऑरी, मौनी रॉय आणि कोरिओग्राफर तुषार कालियासोबत वांद्रे येथील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती. यावेळी, निसाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सनं गर्दी केली. काही फोटोग्राफर्स निसाला न्यासा अशी हाक मारत होते. यावेळी निसा म्हणते, 'माझे नाव निसा आहे.'
View this post on Instagram
ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, निसा स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. निसा ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. तिला 162 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. निसा वेगवेगळ्या ठिकाणी वेकेशनला जाते. तेथील मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तसेच निसा ही अजय आणि काजोलसोबतचे फोटो देखील शेअर करते. अनेक वेळा निसाला तिच्या लूकमुळे ट्रोल केले जाते.
नेटकऱ्यांनी केलं होतं निसाला ट्रोल
निसा काही दिवसांपूर्वी एका पार्टीला जात होती तेव्हा तिचे अनेक फोटोग्राफर्सनं फोटो आणि व्हिडीओ काढले होते. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यानं कमेंट केली होती, 'जान्हवी कपूर आणि न्यासानं एकाच डॉक्टरकडून प्लास्टिक सर्जरी करुन घेतली असेल.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मेकअप केला आहे की चुना लावला आहे' काजोलनं एका मुलाखतीमध्ये निसाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'निसा इंटरनेटवर खूप अॅक्टिव असते. तिला सौंदर्य आणि आरोग्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित आहेत. ती आठवड्यातून तीनदा फेस मास्क लावते आणि मलाही फेस मास्क लावायचा सल्ला ती देत असते. '
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Nysa Devgn: अजय देवगणच्या मुलीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले 'प्लास्टिक सर्जरी केली आहे का?'