Aishwarya Rai Bachchan enjoys Kabaddi Match with Family : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यात दुरावा आला असून ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. अशातच ऐश्वर्या आता सासरे अमिताभ आणि पती अभिषेकसोबत कबड्डीचा सामना पाहताना दिसून आली आहे.


ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा अनेकदा रंगली आहे. पण त्याचवेळी बच्चन कुटुंबीय एकत्र स्पॉट होत या चर्चांना पूर्णविराम देतात. यंदाही असचं घडलं आहे. ऐश्वर्याने नुकतचं लेक आराध्या, पती अभिषेक आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत कबड्डीचा सामना पाहिला आहे.






ऐश्वर्या, अमिताभ बच्चन, आराध्या आणि अभिषेक बच्चन जयपुर पिंक पैंथर या कबड्डी टीमला सपोर्ट करताना दिसून आले. अमिताभ बच्चन यांनी नात आणि सुनेसोबत कबड्डीचा सामना पाहिला. त्यावेळी ते खूप आनंदी दिसत होते. सोशल मीडियावर बच्चन कुटुंबियांचा कबड्डीचा सामना पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


ऐश्वर्या-अभिषेकला एकत्र पाहून चाहते आनंदी


ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त होणार नसल्याने त्यांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. घटस्फोट झालाय कोणाला वाटतं? बेस्ट कपल, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. पण गेल्या दोन महिन्यांपासून ऐश्वर्या तिच्या आईकडे राहत आहे. 


ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये कोणाचं नेटवर्थ सर्वाधिक (Aishwarya Rai Abhishek Bachchan Net worth)


ऐश्वर्याची संपत्ती अभिषेकपेक्षा खूपच जास्त आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 100 मिलियन डॉलर म्हणजेच 826 कोटी रुपये आहे. तर अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या सिनेमांसह जाहिरांतीमधून चांगलीच कमाई करते. एका सिनेमासाठी ती 10 ते 12 कोटी रुपये आकारते. तर जाहिरातींमधून वर्षाला ती 80-90 कोटींची कमाई करते. एका जाहिरातीसाठी दिवसाला ती सहा-सात कोटी रुपयांचा मानधन घेते. अभिषेकनं देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


संबंधित बातम्या


Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan: एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे ऐश्वर्याचा अभिषेकबद्दल मोठा खुलासा; बच्चन कुटुंबीयांच्या घरात रोज काय घडतंय?