Kiran Mane : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) आणि 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. किरण माने आज शिवबंधन (Shivsena) हाती बांधणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray) ते प्रवेश करणार आहेत. 


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप (BJP) विरोधात भूमिका घेत असल्याने आपल्याला एका मनोरंजनक करणाऱ्या वाहिनीतून काढल्याचा माने यांनी आरोप केला होता. आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या माध्यमातून किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.


मातोश्रीवर होणार महत्त्वाचे पक्षप्रवेश (Kiran Mane Join Shiv Sena Uddhav Thackeray )


शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी आज अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत. बीडमधील (Beed) विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे ठाकरे गटात प्रवेश होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) घाटकोपर उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत काही मनसेचे कार्यकर्तेदेखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील. तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किरण मानेदेखील आज मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.


किरण मानेंना भोवलेली राजकीय पोस्ट


किरण माने 'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारत होते. अभिनयासह ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे भाष्य करत असतात. 'मुलगी झाली हो' दरम्यान त्यांनी केलेली राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी राजकीय दबावातून वाहिनीनं मालिकेतून काढलं, या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आलं त्यानंतरच मालिकेतून काढलं असल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. 


किरण माने सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय भूमिका मांडत असतात. त्यांच्या या वादग्रस्त पोस्टमुळे अनेकदा ते ट्रोल होतात. 'सातारचा बच्चन' अशी किरण माने यांची ओळख आहे. सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारे किरण माने सध्या 'सिंधुताई माझी माई' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत किरण माने यांची महत्त्वाची भूमिका साकारली होती. 


संबंधित बातम्या


Kiran Mane: "आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे त्वरित थांबवा"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष