Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांचा 'प्रतीक्षा' हा बंगला जेव्हापासून लेक श्वेता नंदा हिच्या नावावर केला तेव्हापासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऐश्वर्या राय वर्षाला 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करते. कमाईच्या बाबतीत तिने पती अभिषेक बच्चनलाही (Abhishek Bachchan) मागे टाकलं आहे. 


अभिषेक बच्चनपेक्षा ऐश्वर्याची कमाई जास्त (Aishwarya Rai Bachchan Net Worth)


मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 100 मिलियन डॉलर म्हणजेच 828 कोटींच्या आसपास आहे. ऐश्वर्या राय बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांसह अनेक मोठ-मोठ्या ब्रँडचं प्रमोशन आणि जाहिरातीदेखील करते. या जाहिरातींच्या माध्यमातून ती चांगलेच पैसे कमावते. ऐश्वर्या अनेक ब्यूटी प्रोडक्टच्यादेखील जाहिराती करते. या जाहिरातींच्या माध्यमातून ती वर्षाला कोट्यवधी रुपये कमावते. 


ऐश्वर्या एका सिनेमासाठी किती रुपये आकारते? (Aishwarya Rai Bachchan Movie Fees)


ऐश्वर्या राय बच्चनने लग्नानंतर आधीपेक्षा खूप कमी सिनेमांत काम केलं आहे. निवडक सिनेमांना ती होकार देते. एका सिनेमासाठी ऐश्वर्या 10 ते 12 कोटी रुपयांचं मानधन घेते. तर फक्त एका जाहिरातीच्या माध्यमातून ती 90 कोटी रुपयांची कमाई करते. एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी एका दिवसाचे ती 6-7 कोटी रुपये आकारते. ऐश्वर्या राय बच्चन अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडचा चेहरा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील जाहिरातींच्या माध्यमातून ती कोट्यवधी रुपये कमावते. 


ऐश्वर्याचं मुंबई अन् दुबईत घर


ऐश्वर्या राय बच्चनची बीकेसीमध्ये 5BHK आलीशान अपार्टमेंट आहे. 2015 मध्ये तिने ही अपार्टमेंट खरेदी केली आहे. या अपार्टमेंटची किंमत 21 कोटींच्या आसपास आहे. मुंबईतील वरळी भागात ऐश्वर्याचं आणखी एक लग्झरी अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत 41 कोटींच्या आसपास आहे. तसेच दुबईतील सेंचुरी फॉल्स परिसरात ऐश्वर्याने एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे. या व्हिलाची किंमत 15.6 कोटी रुपये आहे. 


ऐश्वर्या राय बच्चनचं कार कलेक्शन (Aishwarya Rai Bachchan Car Collection)


ऐश्वर्या राय बच्चनकडे अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. ऐश्वर्याकडे 7.95 कोटींची रोल्स रॉयस घोस्ट कार आहे. काही वर्षांपूर्वी तिने ही गाडी विकत घेतली आहे. तसेच ऐश्वर्याकडे लेक्सस एलएक्स 570 आणि ऑडी ए8 एल (1.56 कोटी) रुपयांच्या कारचा समावेश आहे.वेगवेगळ्या कारमध्ये फिरायला तिला आवडतं. बच्चन कुटुंबियांच्या गाड्यांचा ती वापर करत नाही.


संबंधित बातम्या


Aishwarya Rai Bachchan Jaya Bachchan :  कहानी घर-घर की! जया बच्चन याचं बोलणं ऐकून ऐश्वर्याला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ