Aishwarya Rai Bachchan Jaya Bachchan :  ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि बच्चन कुटुंबियांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय ही आपल्या माहेरी निघून आली असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या चर्चांना ऐश्वर्याने पूर्णविराम लावताना अफवा असल्याचे दाखवले. ऐश्वर्या राय ही सासू जया बच्चनसोबत (Jaya Bachchan) फार कमी वेळा दिसून येते. 


कधीकाळी जया बच्चन हे आपल्या सुनेचे कौतुक करताना थकत नसत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सासूबाई जया यांनी केलेल्या कौतुकामुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले होते. 


जेव्हा ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू आले...


ही गोष्ट खूप जुनी आहे. त्यावेळी नुकतेच ऐश्वर्या रायचे लग्न अभिषेक बच्चनसोबत झाले होते. लग्नानंतर जया फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये उपस्थित होत्या. या ठिकाणी जया यांनी आपल्या सुनेबद्दल अशा काही हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या. सासूबाईंनी केलेल्या कौतुकानंतर ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले. 


जया बच्चन यांनी काय म्हटले?


जया बच्चन यांनी म्हटले की, 'मी पुन्हा एकदा एका सुंदर मुलीची सासू झाली आहे, जिच्याकडे खूप मूल्य आणि प्रतिष्ठा आहे. मलाही तिचं हसणं खूप आवडतं. बच्चन परिवारात मी तुझं स्वागत करते. मी तुला सांगू इच्छितो की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. सासूच्या या भाषणानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेली ऐश्वर्या खूपच भावूक झाल्याचे दिसून आले. ऐश्वर्याला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने रडू कोसळले.






जया बच्चन यांनी अनेकदा ऐश्वर्याचे कौतुक केले होते. ती अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसली आहे. एका जुन्या मुलाखतीत जया म्हणाली होती की, 'तिचे ऐश्वर्यासोबत मित्रासारखे नाते आहे. तिला केव्हाही वाईट वाटले तर ती उघडपणे सांगते.