एक्स्प्लोर
एअरटेल गर्ल पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर साशा ट्रेण्डिंगमध्ये
मुंबई : एअरटेल गर्ल अर्थात साशा छेत्री पुन्हा एकदा चर्चेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात एअरटेलचं नेटवर्क मिळतं, असा दावा करणारी साशा वादाता सापडली असून सोशल मीडियावर तिच्याबाबत अनेक बातम्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये साशाविरोधात खटला दाखल झाल्यापासून ती एअरटेल सोडून रिलायन्स जिओमध्ये सामील झाल्याचं म्हटलं जात आहे.
सत्य काय आहे?
साशाने एअरटेल 4G सोडून रिलायन्स जिओ जॉईल केल्याचं वृत्त microfinancemonitor.com ने तीन दिवसांपूर्वी छापलं होतं. यानंतर ती सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये होती. नेटीझन्सनी साशाबाबत अनेक कमेंट्स केल्या.
खरंतर या बातमीद्वारे लोकांना एप्रिल फूल बनवलं जात होतं. "साशाने एअरटेल सोडलं कारण सिग्नल व्यवस्थित न आल्याने मियाम लेकवर राहणाऱ्या एका व्यक्तीला भारत-वेस्ट इंडिज सामना पाहता आला नाही. त्यामुळे त्याने एअरटेल आणि साशाविरोधात खोटा दावा केल्याचा खटला दाखल केला," असं वृत्त microfinancemonitor.com ने छापलं होतं.
उत्तराखंडची मुलगी ‘एअरटेल 4G’च्या जाहिरातीत कशी झळकली?
मात्र साशाने एअरटेल सोडल्याचं वृत्त सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये होतं. याआधी 2015 मध्ये साशाला इंटरनेटवर पसंत नसलेली मुलगी सांगितलं जात होतं. इतकंच नाही तर शिवाय तिचे काही आक्षेपार्ह फोटोही शेअर केले होते. कोण आहे साशा छेत्री साशा छेत्री ही मूळची उत्तराखंडची आहे. मुंबईतील झेवियर्स इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समधून साशाने जाहिरातीचं शिक्षण घेतलं आहे. एअरटेल 4G कँपेननंतर देशभरातील कोट्यवधी लोक साशाला ओळखू लागले आहेत. मात्र, ‘एअरटेल गर्ल’ म्हणूनच तिला लोक अद्यापही ओळखतात. साशा म्युझिक आर्टिस्टही आहे. तिने ट्रेनी कॉपिरायटर म्हणूनही काम केलं आहे. त्यासोबत अभिनय आणि मॉडेलिंगचाही साशाला अनुभव आहे. मात्र, एअरटेल 4G च्या जाहिरातीमुळे साशा घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रॉल व्हॉट्सअॅप, ट्विटर किंवा फेसबुक साशा छेत्री इंटरनेटवर सर्वाधिक ट्रॉल झालेली मुलगी आहे. एअरटेलसंदर्भातील तिचे अनेक फोटो आणि जोक्स शेअर केले जातात.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement