एक्स्प्लोर

Suhana Khan And Agastya Nanda: बिग बींच्या नातवाला डेट करतीये शाहरुखची लेक? सुहाना आणि अगस्त्यचा व्हिडीओ व्हायरल

सुहानाचं (Suhana Khan) नाव सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदासोबत (Agstya Nanda) जोडलं जात आहे.

Suhana Khan And Agastya Nanda:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शहरूख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहानाचं नाव सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदासोबत (Agstya Nanda) जोडलं जात आहे. नुकताच सुहाना आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अगस्त्य आणि सुहाना केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. 

बुधवारी (29 मार्च)  तानिया श्रॉफच्या (Sania Shroff) बर्थ-डेला सुहाना खान आणि अगस्त्य नंदाने हजेरी लावली. या बर्थ-डे पार्टीमधील सुहाना आणि अगस्त्य यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तानिया आणि अहान शेट्टी  देखील दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तानिया, अहान आणि अगस्त्य हे सुहाना कारमध्ये सोडण्यासाठी येतात. यावेळी अगस्त्य सुहानाला फ्लाईंग किस देतो, असं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

तानिया श्रॉफच्या बर्थ-डे पार्टीसाठी सुहानानं शिमरी लॉन्ग ड्रेस आणि हिल्स असा लूक केला होता. तर अगस्त्य नंदानं ब्लॅक टीशर्ट आणि ब्लू-डेनिम असा लूक केला होता. तानिया श्रॉफच्या बर्थ-डेला अगस्त्य आणि सुहाना यांच्यासोबतच आर्यन खान, संजय कपूर आणि शनाया कपूर यांनी देखील हजेरी लावली. चंकी पांडेचा मुलगा अहान पांडेसोबत देखील सुहानाचं नाव जोडलं जात होतं. पण आता सुहाना आणि अगस्त्य यांच्या नात्याची चर्चा सोशर मीडियावर सुरु आहे. 

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा हे 'द आर्चीज'  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामधून बोनी कपूरची मुलगी खुशी कपूरही या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.  सुहाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इंस्टाग्रामवर 3 मिलीयनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये गौरी खान सुहानाला देणार डेटिंग टिप्स; म्हणाली, 'एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget