मुंबई : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आपला लूक, फिटनेस आणि लव्ह लाईफ बद्दल कायम चर्चेत असतो. तो आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. ग्लॅमरच्या दुनियेतील या जोडीने प्रेमाचा एक आदर्श जगासमोर ठेवला आहे. हे दोघेही नेहमी आपल्या जुन्या आठवणी आणि एकमेकांसोबतचे बॉन्डिंग आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. अंकिता कोंवरने असाच एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत स्पेन ते पोर्तुगाल पायी प्रवासाचा एक किस्साही सांगितला आहे.

Continues below advertisement

मिलिंद आणि अंकिता या दोघांनाही अॅडव्हेन्चर पसंत आहे. तशाच प्रकारच्या ट्रिप हे दोघेही नेहमीच करतात. असाच एका ट्रिपचा फोटो अंकिताने शेअर केला आहे. या फोटोत अंकिता कॅज्युअल लूकमध्ये दिसून येतेय तर बॅकग्राऊंडही खूप सुंदर दिसतंय. 

हा फोटो शेअर करताना अंकिताने लिहिलं आहे की, "पोर्तुगाल ते स्पेन प्रवासातील एक मजेदार झलक. मी आणि मिलिंदने हे 320 किलोमीटरचे अंतर पायी कापलं. या दरम्यान आम्ही देशातील आणि जगतील अनेक रंगीबेरंगी लोकांना भेटलो. मी एका जुन्या बोगद्यासमोर उभी आहे जे या प्रवासाच्या वाटेत आम्हाला भेटलं." 

Continues below advertisement

 

अंकिताच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळत असून त्याच्यावर कमेंटचा पाऊसही पडत आहे. 

अभिनेता मिलिंद सोमनचे धावण्यावरचे प्रेम जगजाहीर आहे. एप्रिल महिन्यात मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली होती. त्याने 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर लगेच धावायला सुरुवात केली होती. 

मिलिंद-अंकिताने 2018 साली केलं लग्नमिलिंद सोमनने आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी 2018 साली लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाची मोठी चर्चा झाली होती. हे दोघेही आपले वेगवेगळे व्हिडीओज आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. 

संबंधित बातम्या :