Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे चौदावे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात पहिल्यांदाच 75 लाखांसाठीचा प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला 75 लाख मिळणार आहेत. तर अयोग्य उत्तर देणाऱ्याला फक्त 3 लाख 20 हजार मिळणार आहेत. 


'कौन बनेगा करोडपती 14'चे दोन प्रोमो आऊट झाले आहेत. यात प्रोफेसर धुलीचंद अग्रवाल आणि सॉफ्टवेअर इंजीनियर श्रूती दागा 'कौन बनेगा करोडपती 14' हा खेळ खेळताना दिसत आहेत. दोघेही 'कौन बनेगा करोडपती 14'च्या पहिल्याच एपिसोडमध्ये 15 व्या प्रश्नापर्यंत पोहोचले आहेत. आता 15 व्या प्रश्नाचे धुलीचंद आणि श्रूती योग्य उत्तर देणार का हे प्रेक्षकांना आगामी भागात कळणार आहे. 


'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर यायला लागले 21 वर्ष


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्याची गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर येणं हे माझं स्वप्न होतं, असे धुलीचंद अग्रवाल म्हणाले. धुलीचंद यांनी तीन लाइफलाइन न घेता 50 लाख जिंकले आहेत. त्यामुळे आता ते 75 लाख जिंकणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 






50 लाखांच्या प्रश्नासाठी आमिर खानला घ्यावी लागली ‘लाईफलाईन’ची मदत


आमिर खान, मेजर डीपी सिंह आणि कर्नल मिताली मधुमिता यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा खेळ खेळण्यात आला. 50 लाखांच्या प्रश्नावर त्यांचा खेळ अडकला. उत्तर माहित नसल्याने त्यांना लाईफलाईनची मदत घ्यावी लागली. प्रश्नावर अडकल्यानंतर स्पर्धकांनी लाईफलाईनची मदत घेतली. लाईफलाईनच्या मदतीने त्यांनी 50 लाखांची रक्कम जिंकली आणि ती आर्मी सेंट्रल वेल्फेअरला दान केली. 


संबंधित बातम्या


KBC 14 : 50 लाखांच्या प्रश्नासाठी आमिर खानला घ्यावी लागली ‘लाईफलाईन’ची मदत! तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?


Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती 14'चा आज होणार ग्रॅंड प्रीमियर; स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होणार साजरा