Kaun Banega Crorepati 14 Premiere 7 August 2022 : 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) हा छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम आहे. यंदादेखील या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सांभाळणार आहेत. आज या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. सोनी टीव्हीवर या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
'कौन बनेगा करोडपती 14'मध्ये प्रेक्षकांना अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आमिर खान सहभागी होणार आहे. 'कौन बनेगा करोडपती 14' हा कार्यक्रम आज रविवारी 7 ऑगस्टला रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदेखील साजरा करण्यात येणार आहे.
'कौन बनेगा करोडपती'चा प्रीमियर खूपच खास असणार आहे. प्रीमियरला आमिर खान उपस्थित राहणार आहे. आमिरला 2010 साली प्रदर्शित झालेल्या '3 इडियट्स' (3 Idiots) या सिनेमासाठी पद्मभूषण (Padma Bhushan) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर आमिर 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहे.
'कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या