Aditya Sarpotdar on Munjya : बॉक्स ऑफिसवर सध्या एका मराठी दिग्दर्शकाचा सिनेमा तुफान गाजतोय. नुकत्याच आलेल्या बॉलीवूडच्या सिनेमांनाही त्याने मागे टाकत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तो सिनेमा म्हणजे दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा (Aaditya Sarpotdar) 'मुंज्या' (Munjya). मराठमोळी शर्वरी वाघ ही मुख्य भूमिकेत तर रसिका वेंगुर्लेकर, सुहास जोशी यांच्यासह अनेक मराठी कलाकार हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या सगळ्यावर आता आदित्य सरपोतदारची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


आठव्या दिवसापर्यंत या सिनेमाने 50 कोटींच्या जवळपास गल्ला जमवला आहे. मोठी स्टारकास्ट नसताना अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या सिनेमाने पहिल्या चार दिवसांतच बजेट रिकव्हर केलं. त्यामुळे वेगळी गोष्ट असल्याच प्रेक्षक देखील सिनेमागृहाकडे वळतात हे मुंज्याने बॉक्स ऑफिसवर दाखवून दिलं. दरम्यान या सिनेमाची प्रेरण कांतारा सिनेमापासून मिळाली असल्याचं आदित्यने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 


कसा तयार झाला मुंज्या?


दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्यने म्हटलं की, मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे, ज्या कोकणात, महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत. पण अशा गोष्टींवर सिनेमा का बनत नाही, हा प्रश्न मला लहानपणापासूनच पडायचा. अशा गोष्टींवर आधारित कांतारा सिनेमा खूप गाजला होता. त्यामुळे मला असं वाटतं की, आपल्या महाराष्ट्रात आणि देशातील प्रत्येक प्रांतात अशा अनेक कथा आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जर सिनेमे तयार झाले तर विषयांची कमरता आपल्याला भासणार नाही. हॉलिवूडमध्ये तर 50-60 वर्षांत लिहिलेल्या पुस्तकांवर सिनेमे आणि मोठ्या मालिका तयार करण्यात आल्या आहेत. गेम ऑफ थ्रोन्स, हॅरी पॉटर यांसारख्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे शतकानुशतके टिकून राहणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, म्हणून चित्रपटांच्या कथेसाठी कमरता कधीही भासणार नाही. 


''मुंज्या''ने सात दिवसात किती केली कमाई?


'मुंज्या' चित्रपटाने सहा दिवसात आपला बजेट वसूल केले.  हॉरर कॉमेडीपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून  बॉलिवूडमध्ये याचीच चर्चा आहे. चित्रपटाची सुरुवात  चांगली झालीच शिवाय ''मुंज्या''ने ओपनिंग वीकेंडला चांगली कमाई केली. यानंतर, चित्रपटाने वीकडेज मध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई केली. चित्रपट रिलीज झाल्याच्या सहा दिवसांच्या आधीच चित्रपटाचा निर्मिती खर्च वसूल केला आहे. 


''मुंज्या''ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 8 कोटी, चौथ्या दिवशी 4 कोटी, 4.15 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी कोटी आणि सहाव्या दिवशी 4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता चित्रपटाच्या रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या कमाईचे आकडेही आले आहेत.


सॅकनिल्कच्या वृत्तानुसार,  'मुंज्या'ने रिलीजच्या सातव्या दिवशी 3.75 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर आठवडाभरात आता एकूण 35.15 ची कमाई केली आहे. 


ही बातमी वाचा : 


Sahitya Akademi Award 2024 : साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा,  सासणेंच्या 'समशेर' आणि भूतबंगला' अन् सौदागरांच्या 'उसवण'चा सन्मान