Sahitya Akademi Award 2024 : साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाच्या असलेल्या साहित्य अकादमीच्या 2024च्या (Sahitya Akademi Award 2024) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मराठी भाषेतील साहित्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार भारत सासणे (Bharat Sasne) यांचा बालसाहित्यासाठी आणि देविदास सौदागर (Devidas Saudagar) यांचा युवा साहित्यासाठी सन्मान करण्यात येणार आहे. 


यामध्ये भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूतबंगला' तसेच देविदास सौदागर यांच्या 'उसवण' कादंबरीची निवड करण्यात आली आहे. उसवणसाठी देविदास सौदागर यांना मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार आणि भारत सासणे यांना बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या पुरस्कारांचं स्वरुप हे 50 हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असं असणार आहे. 


मराठीसह इतर भाषांमधलेही पुरस्कार जाहीर


साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 23 सदस्यांच्या संमनीनंतर या पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये मराठीसह नेपाळीसह 24 भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.   दरम्यान साहित्य अकादमीच्या या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेतील दोन साहित्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी कवितासंग्रह, बालसाहित्य, कादंबरी यांसारख्या अनेक साहित्यांचा आणि साहित्यिकांचा समावेश करण्यात आलाय. 


'उसवण'मधून तरुणाची कथा


मराठी भाषेसाठी तुळजापूरच्या देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला यावर्षीचा युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर  करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सध्याच्या रेडिमेड कपड्याच्या काळामध्ये टेलरिंगचं काम करणाऱ्या तरुणाच्या जीवनाची व्यथा उसवण या कादंबरीतून मांडली आहे. देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीची दखल यापूर्वी एबीपी माझाच्या 'आनंदाचे पान' कार्यक्रमात घेण्यात आली होती. 










ही बातमी वाचा : 


Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंवरील संघर्षयोद्धा सिनेमातील भूमिकेवर छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले 'मला त्यावर...'