Aditya Roy Kapur Dating Ananya Panday: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि  अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) या दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरु आहे. दोघेही एकमेकांना डेट करत  आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता आदित्य रॉय आणि अनन्या यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.


व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये आदित्य आणि अनन्या पोर्तुगालमधील एका रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत बसलेले दिसत आहेत.या फोटोमध्ये आदित्यनं डार्क ब्लू कलरचा शर्ट घातलेला दिसत आहे आणि अनन्या मरून कलरच्या टॉपमध्ये दिसत आहे.  






अनन्या आणि आदित्यचा फोटो व्हायरल होण्याची ही पहिली  वेळ नाहीये. याआधीही या दोघांचे स्पेनमध्ये फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. फोटोमध्ये आदित्य अनन्याला मिठी मारताना दिसत होता.  






आदित्य आणि अनन्याच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली, जेव्हा ते दोघे क्रिती सेननच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते. तेव्हापासून  अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यानंतर कॉफी विथ करण 7 मध्ये करण जोहरने अनन्याला आदित्यबद्दल प्रश्न विचारले होते. पण अनन्या आणि आदित्य यांनी त्यांच्या डेटिंगबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही.


आदित्यचे चित्रपट


 आदित्य रॉय कपूर हा अनुराग बसूच्या  'मेट्रो इन दिनों' या   आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यचा  ‘गुमराह’ (Gumraah) हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. आता आदित्यच्या 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच अनन्या पांडेचा  'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


संबंधित बातम्या


डेटिंगच्या चर्चेदरम्यान Aditya Roy Kapur आणि Ananya Panday स्पेनमध्ये स्पॉट; म्युझिक कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल