Shahrukh Khan On Affair Rumors With Priyanka Chopra: बॉलिवूडमध्ये एकमेकांशी अफेअर असण्याच्या अफवा सध्या काही नव्या नाहीत, पण एक काळ असा होता की त्या अफवांमुळे अभिनेता वा अभिनेत्रीच्या कौटुंबीक आयुष्यावर परिणाम व्हायचा. कधी कधी या अफवांमुळे तर संसार मोडायच्या मार्गावर असायचे. बॉलिवूडचा किंग खानही त्यातून गेला होता. एक वेळ अशी आली होती की शाहरूख खान आणि प्रियंका चोप्राचे अफेअर सुरू असल्याच्या वावड्या उठल्या होत्या आणि त्यामुळे शाहरूखचा संसार मात्र मोडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचला होता.
शाहरूख खान हा इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्रीचा आवडता हिरो आहे आणि आयुष्यात एकदा तरी त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी अशी अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. शाहरुख खानने राणी मुखर्जी ते चुही चावला आणि काजोल ते दीपिका पदुकोनसोबत काम केलं आहे. पण बिल्लू बार्बर (Billu Barber) आणि डॉन (Don) चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्यसोबत काम केलेल्या प्रियंका चोप्राशी अफेअर असल्याच्या अफवा चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या.
शाहरूख खान आणि प्रियांका चोप्राच्या जवळीकीच्या बातम्यांमुळे शाहरुखचा संसास तुटण्याच्या मार्गावर होता. दुसरीकडे शाहरूखचा बेस्टी करण जोहर (Karan Johar News) याने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि शाहरूखची पत्नी गौरीला समजावले. मात्र, करण जोहरमुळे प्रियांका चोप्राला बॉलिवूडमधून बाहेर फेकण्यात आल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे तिला हॉलिवूडमध्ये जावे लागले होते.
शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो प्रियांका चोप्रासाठी गाणे गाताना दिसत आहे. त्या गाण्यात तो इंग्लिशमध्ये म्हणताना दिसतोय की, मॅरी मी, मॅरी मी. त्याचवेळी प्रियांका त्याच्याकडे आश्चर्याने पाहत हसताना दिसली. शाहरुख खान आणि प्रियांकाच्या नात्याच्या अफवांवर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. फरहान अख्तरने एका मुलाखतील प्रियंकाला विचारणा केली आहे. तिच्या आगामी सिनेमाचं नाव 'डॉन 3' असणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात प्रियांकासोबत शाहरुख खान झळकणार असल्याची चर्चा आहे.
प्रियंका चोप्राचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2016 मधला एमी पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आहे. एक पत्रकार प्रियंकाला भारतीय सिनेसृष्टीबद्दल प्रश्न विचारत आहे. तसेच अभिनेत्रीला नृत्याची झलक दाखवण्यास सांगत आहे. त्यावर प्रियंका म्हणते,"भारतीय सिनेमांत फक्त हिप्स आणि बूब्सवर फोकस करण्यात येतं". त्यानंतर प्रियंका नृत्याची झलक दाखवते.
ही बातमी वाचा: