Project K Deepika Padukone First Look Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लूक आऊट झाला आहे. निर्मात्यांनी मध्यरात्री दीपिकाचा फर्स्ट लूक आऊट केला आहे.
'प्रोजेक्ट के'च्या (Project K Deepika Padukone First Look) निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत दीपिकाचा लूक आऊट केला आहे. सोशल मीडियावर सध्या दीपिकाचा इंटेंस लूक व्हायरल होत आहे. 'प्रोजेक्ट के'मधील दीपिकाच्या लूकने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आऊट
दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या लूकमध्ये दीपिका पादुकोणने काळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केला आहे. तसेच या पोस्टवर सिनेमाची रिलीज डेटही लिहिण्यात आलेली आहे. दीपिकाचा फर्स्ट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. दीपिकाच्या या लूकवर हा सिनेमा सुपरहिट होणार अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
तगडी स्टारकास्ट असलेला 'प्रोजेक्ट के' (Project K Starcast)
'प्रोजेक्ट के' या सिनेमात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोणसह (Deepika Padukone) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कमल हासन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवस ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी शो मस्ट गो ऑन म्हणत पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली.
'प्रोजेक्ट के' कधी प्रदर्शित होणार? (Project K Released Date)
'प्रोजेक्ट के' (Project K) हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळ, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) 2023 मध्ये प्रदर्शित होणारा 'प्रोजेक्ट के' हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे.'प्रोजेक्ट के' हा वैजयंती मूव्हीज निर्मित सिनेमा आहे आहे.
संबंधित बातम्या