Aditya Roy Kapur and Ananya Panday : हिंदी सिनेसृष्टीत सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्यावर्षी कृती सेननने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत आदित्य आणि अनन्या एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर आदित्यनेही करण जोहरच्या चॅट शोमध्ये याबद्दल संकेत दिले होते. आता डेटिंगच्या चर्चेदरम्यान आदित्य आणि अनन्या स्पेनमध्ये स्पॉट झाले आहेत. 


आदित्य आणि अनन्याने त्यांचं नातं जगजाहीर केलेलं नाही. पण लवकरच ते याबद्दल मौन सोडतील असे म्हटले जात आहे. दरम्यान दोघेही स्पेनमधील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसले आहेत. स्पेनमधील आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टमध्ये त्यांनी भाग घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. 


अनन्या आणि आदित्य दोघांनीही सोशल मीडियावर स्पेनमधील फोटो शेअर केले आहेत. यावरुन ते दोघेही एकाच ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनन्याने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती स्पेनमधील आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टचा आनंद घेताना दिसली. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं  होतं,"आर्क्टिक मंकीजसारखं काही नाही... माझं आवडतं गाणं". तर आदित्यनेही याच कॉन्सर्टचा एक व्हिडीओ शेअर केला होता. 






'लायगर' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अनन्या म्हणाली होती,"अजून मी लहान असून लग्नाचा विचार केलेला नाही. अद्याप लग्नाचं नियोजन केलेलं नाही. माझं वय हे लग्नासाठी योग्य नाही". अनन्याचा 'लायगर' हा बिग बजेट सिनेमा होता. पण प्रेक्षकांनी मात्र या सिनेमाकडे पाठ फिरवली.


आदित्य आणि अनन्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Aditya Roy Kapur Ananya Panday Upcoming Project)


आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) सध्या अनुराग बसूच्या आगामी 'मेट्रो इन दिनों' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'लाइफ इन अ मेट्रो'चा सीक्वेल 'मेट्रो इन दिनों' असणार आहे. तर दुसरीकडे अनन्या पांडेचा (Ananya Panday) 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती आयुष्मान खुरानासोबत झळकणार आहे.


संबंधित बातम्या


Gumraah Movie Review : गुन्हेगारीवर भाष्य करणारा आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह'