Adipurush New Poster Controversy : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतचं या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालं असून आता या पोस्टवरुन नवा वाद सुरू झाला आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे या पोस्टवरुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याने ओम राऊतसह (Om Raut) कलाकारांवर संजय तिवारी यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
'आदिपुरुष'च्या नव्या पोस्टरमध्ये काय आहे? (Adipurush New Poster)
'आदिपुरुष'च्या नव्या पोस्टरमध्ये प्रभास (Prabhas) श्री रामाच्या भूमिकेत, सनी सिंह (Sunny Singh) लक्ष्मणाच्या तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच क्रिती सेनन (Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेत दिसून येत आहे.
'आदिपुरुष' सिनेमाचं नवं पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. दरम्यान संजय तिवारी नामक एका व्यक्तीने साकीनाका पोलीस ठाण्यात ओम राऊतसह सिनेमातील कलाकारांवर तक्रार दाखल केली आहे. या सिनेमाच्या पोस्टरमुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊत, निर्माता भुषण कुमार आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
'आदिपुरुष'च्या नव्या पोस्टवरवरुन मुंबई उच्च न्यायालयात आशिष राय आणि पंकज मिश्रा या वकिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की,"आदिपुरुष' सिनेमात रामचरितमानसमधील ज्या व्यक्तिरेखा निर्मात्यांनी घेतल्या आहेत त्यांचं चुकीचं चित्रण केलं आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. आता याप्रकरणी कलम 295 (अ), 298,500 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
'आदिपुरुष'च्या नव्या पोस्टवरमधील व्यक्तिरेखांपैकी कोणीही जानवे परिधान केले नाहीत. तसेच सीतेच्या भांगेत कुंकू नाही. सिने-निर्मात्यांनी हे जाणीवपूर्वक केलं आहे. त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचं तक्रारदारांनी म्हटलं आहे".
'आदिपुरुष' हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या