RRR In Japan: 'आरआरआर' (RRR) या चित्रपटानं भरातातच नाही तर जगभरात विशेष लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं ऑस्कर पटकावला. आता आरआरआर या चित्रपटानं जपान (Japan) देशातील चित्रपटगृहाच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट जपानमधील 44 शहरे आणि प्रांतांमध्ये 209 स्क्रीन्स आणि 31 IMAX स्क्रीनवर रिलीज झालेला. आरआरआर हा चित्रपट जपानमध्ये 1 मिलियनेक्षा जास्त फुटफॉल करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
आरआरआर मूव्ही या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट आरआरआर या चित्रपटाच्या जपानमधील कमाईबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, आरआरआर चित्रपटानं जपानमध्ये 164 दिवसांमध्ये 1 मिलियन + फुटफॉल रेकॉर्ड केले आहे आणि या चित्रपटाचा रॉकिंग रन अजून सुरु आहे.' आरआरआर या चित्रपटानं जपानमध्ये हा रेकॉर्ड केल्यानं आता अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.
एस एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी शेअर केले ट्वीट
आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी देखील जपानमधील प्रेक्षकांसाठी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, 'जपानमधील प्रेक्षकांकडून 1 मिलियन हग्स. अरिगेटो गुजैमासु'
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'RRR' चित्रपटानं आतापर्यंत जपानमधील बॉक्स ऑफिसवर 80 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
आरआरआर या चित्रपातील नाटू-नाटू या गाण्यानं ऑस्कर पटकावला. या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: