मुंबई : कोरोना व्हायरसंनं अख्ख जग वेठीस धरलं आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. कोरोना संकटात आपल्या सर्वांच्याच मदतीसाठी धावून आले डॉक्टर्स, पोलीस आणि इतर फ्रंट लाइन वर्कर्स. यापैकी अनेकांनी आपलं कर्तव्य बजावताना जीव गमावले. कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या फ्रंट लाइन वर्कर्सच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. तर अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं. अशातच आता कोरोना काळात कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या मुंबई पोलिसांचं योगदान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) नं एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. 


बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. कोरोना संकटात मुंबई पोलिसांनी दिलेल्या योगदानाची तिनं या व्हिडीओमधून दखल घेतली आहे. कोरोना संकटात कर्तव्यावर असताना 118 पोलिसांचा मृत्यू झाला. व्हिडीओमध्ये तापसीचा आवाज आहे. तापसीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तापसीनं म्हटलं आहे की, "तुम्हाला माहीत आहे, या सर्व लोकांमध्ये एकाच गोष्टीचं साम्य आहे, ओळखू शकता? नाही ना, चला मी तुम्हाला एक हिंट देते. हे सगळे तुमच्या कुटुंबाशी जोडलेले आहेत. अरे, तरीही नाही ओळखलंत तुम्ही यांना?"


या व्हिडीओमध्ये पुढे बोलताना तापसी म्हणते की, "ठीक आहे, काहीच हरकत नाही. तसंही हे सगळे पदड्यामागूनच काम करतात. या सगळ्यांचा मृत्यू झालाय... कोरोनामुळे. जेणेकरून तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहिल. आपल्या लोकांची काळजी घेणं, त्यांची रक्षा करणं, हाच तर आहे कुटुंबाचा अर्थ. जे आपल्यासाठी आपला जीव गमावू शकतात, ते आपले सख्खे नाहीत तर मग कोण आहेत?"



तापसीनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येतं. व्हिडीओच्या सर्वात शेवटी एक संदेशही देण्यात आला आहे. 'घरी राहा, सुरक्षित राहा'. सध्या तापसीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. चाहत्यांनी तापसीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंट्स करत कोरोना संकटात प्राण गमावलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहीली आहे.


दरम्यान, तापसीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर तापसी पन्नूचा आगामी 'हसीन दिलरूबा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तापसीनं या चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं आहे. दिग्दर्शक विनील मॅथ्यू (Vinil Mathew) यांचा हा चित्रपट 2 जुलै 2021 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. तापसीनं ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :