एक्स्प्लोर
'दृष्यम'फेम अभिनेत्री श्रिया सरन लग्नाच्या बोहल्यावर
अभिनेत्री श्रिया सरन रशियन बॉयफ्रेण्ड अँड्री कोसचीवसोबत उदयपूरमध्ये लग्न करणार आहे.
मुंबई : अनुष्का शर्मानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री बोहल्यावर चढत आहे. 'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन रशियन बॉयफ्रेण्ड अँड्री कोसचीवसोबत लग्न करणार आहे.
उदयपूरमध्ये 'डेस्टीनेशन वेडिंग' करण्याचा श्रियाचा प्लान आहे. 17 ते 19 मार्च या कालावधीत हा विवाहसोहळा होणार आहे. विशेष म्हणजे हिंदू पद्धतीनुसारच लग्न पार पडणार आहे.
श्रियाचा बॉयफ्रेण्ड अँड्री कोसचीव रशियातील धडाडीचा व्यावसायिक आहे. 'डोमावकुस्नी' या रेस्टॉरंट चेनचा तो संस्थापक आहे. तो राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटूही आहे. 2015 मध्ये अँड्रीने 'बेस्ट यंग आंत्रप्रिन्योर' हा किताब पटकवला होता. रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये तो आई आणि भावासोबत राहतो.
श्रिया सरनने तुझे मेरी कसम, थोडा तुम बदलो थोडा हम, शुक्रिया, आवारापन, मिशन इस्तंबुल यासारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. अजय देवगनसोबत तिचा 'दृष्यम' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. याशिवाय अनेक तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटात तिने काम केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement