एक्स्प्लोर

Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री Jacqueline Fernandez ईडीसमोर हजर, नोंदवला जबाब

Jacqueline Fernandez In Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री Jacqueline Fernandez ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली होती. जॅकलीननं दुसऱ्यांदा याप्रकरणी जबाब नोंदवला आहे.

Jacqueline Fernandez In Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस  (Jacqueline Fernandez) चं नाव गेल्या काही दिवसांपासून एक मनी लॉन्ड्रिंग केस (Mony Laundering Case) मध्ये चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वीच जॅकलीन फर्नांडिसच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, जॅकलीनला ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. जॅकलीन चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचली होती, तसेच तिनं ईडीकडे आपला जबाबही नोंदवला आहे. तसेच जॅकलीनच्या जबाबामुळे भविष्यात ईडीला तपासात मदत होईल, असंही या वक्तव्यात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतच अभिनेत्री नोरा फतेहीलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. .

काय आहे प्रकरण? 

या प्रकरणाबाबत बोलायचं झालं तर 200 कोटींच्या खंडणीपासून या प्रकरणाची सुरुवात झाली होती. तिहार जेलमध्ये बसलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) यानं एका उद्योजकाच्या पत्नीकडून ही रक्कम वसूल केली होती. त्यानंतर या प्रकरणी सुकेशची पत्नी लीना पॉलचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. ईडीनं त्यांचीही चौकशी केली होती. तसेच ईडीनं अनेक ठिकाणी छापेमारीही केली होती. ज्यामध्ये चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यानजिक स्थित त्यांच्या एका आलिशान बंगल्यातून 82.5 लाखंची रोख रक्कम, दोन किलो सोनं, 16 शानदार गाड्यांसह इतरही महागड्या वस्तूंचाही समावेश होतो. एवढंच नाहीतर सध्या सुकेश आणि पत्नी रोहिणी दोघेही अटकेत आहेत. त्यांना 8 ऑगस्ट रोजी एका व्यावसायिकाकडून 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली होती.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री नोरा फतेहीला ईडी म्हणजेच, अंमलबजावणी संचलनालयानं नोटीस बजावली होती. त्यात नोराला दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती.  सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीला ईडीनं नोटीस बजावली होती. तिहारमधील सुकेश रंजन प्रकरणात नोराला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. याच प्रकरणात नोराच्या चौकशीनंतर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget