मुंबई : 'रहना है तेरे दिल मैं' (Rehnaa Hai Terre Dil Mein) चित्रपटातील 'मॅडी' बनून लाखो प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन असलेला अभिनेता म्हणजे आर माधवन. अलिकडेच आलेल्या शैतान (Shaitaan Movie) चित्रपटातून आर माधवन खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केलं. शैतान चित्रपटातील आर माधवनच्या विलनची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आर माधवन यानं सर्व प्रकारच्या भूमिका साकारत त्यांना न्याय दिला आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आर माधवन सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो, ज्यातून तो चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत असतो.
आर माधवननं मुंबईत खरेदी केलं आलिशान घर
अभिनेता आर माधवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आर माधवननं मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. मुंबईंतील बीकेसीमध्ये त्यानं एक आलिशान फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच आर माधवनने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता आर माधवने बीकेसीमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
आलिशान घरात अनेक सुविधा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर माधवने बीकेसीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. हे घरं राहण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हा फ्लॅट अंदाजे 389 चौरस मीटर म्हणजेच 4,182 चौरस फूटमध्ये पसरलेला आहे. ज्यामध्ये दोन पार्किंगसाठीदेखील जागाआहे. हे घरं सिग्निया पर्ल येथे आहे. हा आलिशान फ्लॅट उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहे.
आर माधननच्या आलिशान घराची किंमत किती?
आगामी काळात आर माधवनचा मुंबईतील हाच नवा पत्ता असेल, असं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 22 जुलै रोजी या आलिशान घराचा करार पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी आर माधवनला 1 कोटी पाच लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावं लागल्याची माहिती आहे. या आलिशान घराची किंमत 17.50 कोटी रुपये आहे.
या चित्रपटांमध्ये झळकणार आर माधवन
शैतान चित्रपटानंतर अभिनेता आर माधवन लवकरच दिग्दर्शक एस शशिकांत यांच्या 'टेस्ट' या चित्रपटात दिसणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात नयनतारा आणि सिद्धार्थ यांचीही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे. याशिवाय तो लवकरच एका बायोपिक आणि सायन्स फिक्शन चित्रपटातही झळकणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :