R Madhavan Fitness Journey : छोट्या पडद्यापासून सुरुवात करुन मोठ्या पडद्यावरही अभिनयाची जादू दाखवून प्रसिद्धी मिळवलेले फारच कमी कलाकार आहेत. यातीलच एक म्हणजे आर माधवन. 'रहना है तेरे दिल में' चित्रपटातील 'मॅडी'च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आर माधवने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असून त्यांना न्याय दिला आहे. अलिकडेच आर माधवन शैतान चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. ही भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली.


आर माधवने 21 दिवसात कसं कमी केलं वजन


सध्या आर माधवन चर्चेत आला आहे. पण, याचं कारण चित्रपट नसून त्याची पर्सनल लाईफ आहे. आर माधवनच्या फॅट टू फिट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. माधवने वजन कमी केल्याचं त्याच्या फोटोंवरून दिसत आहे. यामुळे चाहते त्याचं वजन कमी करण्याचं सीक्रेट जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. महत्त्वाचं म्हणजे आर माधवने कोणत्याही जीमला न जाता आणि कोणतीही वर्कआऊट न करता फक्त 21 दिवसात वजन कमी केलं. हे कसं घडलं ते सविस्तर वाचा.


ना जिम, ना वर्कआउट, वजन कसं कमी केलं?


अभिनेता आर माधवनने नुकतेच त्याचं वजन कमी करण्याचं सीक्रेट सांगणारी एक पोस्ट एक्स मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, "इंटरमिडेंट फास्टिंग करणे, 45-60 वेळा अन्न चांगले चावणे. रात्री उशीरा न जेवता दिवसातील शेवटचं जेवण संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी घेणे. सकाळी चालणे आणि रात्री चांगली झोप घेणे आणि यासोबत भरपूर द्रवपदार्थ घेणे. हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे."


माधवनने औषध आणि कसरत न करता वजन कमी केले


अभिनेता आर माधवनने स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो कर्ली टेल्सशी बोलताना च्या आहे की, त्याने व्यायाम, धावणे, औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया न करता 21 दिवसांत स्वत:ला फॅट टू फिट बनवलं. हे करण्यासाठी शरीरासाठी आवश्यक तेवढंच अन्न खाल्लं, असं त्याने सांगितलं. माधवचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला असून त्याच्या फिटनेसचं कौतुकही केलं जात आहे. अनेक जण हा डाईट प्लॅन फॉलो करणार असल्याचं कमेंट करुन सांगत आहे.


आर माधवनचा सीक्रेट डाएट प्लॅन






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Natasa Stankovic : हार्दिक पांड्या आधी 'या' अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये होती नताशा; पाच वर्षांच्या नात्यात दोन वेळा ब्रेकअप