मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात (Salman Khan House Firing) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी आरोपपत्र (Chargesheet) दाखल केलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4 च्या सुमारास सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या घराबाहेर काही राऊंड गोळीबार करून पळ काढला होता. मात्र, गुन्हे शाखेने तपासानंतर आरोपींना अटक केली होती. 


सलमान खानला वारंवार बिश्नोई गँगकडून धमकी


दरम्यान, या प्रकरणात बिश्नोई गँगचं नाव समोर आलं. बिश्नोई गँगने काही याआधीदेखील सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या हल्ल्याचे तार अखेर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जोडले गेले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सलमान खाननेही त्याचा जबाब नोंदवला होता, आता मुंबई पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने 4 जून रोजी सलमान खानचा जबाब नोंदवला होता. या आरोपपत्रात सलमान खाननं काय म्हटलं आहे, ते जाणून घ्या.


काय म्हणाला सलमान?


क्राइम ब्रँचला दिलेल्या माहितीत सलमानने सांगितलं होतं की, 'मी अभिनेता असून गेल्या 35 वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. माझ्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर काही खास प्रसंगी माझ्या चाहत्यांची गर्दी जमते. माझ्या चाहत्यांवर माझे प्रेम दाखवण्यासाठी मी माझ्या फ्लॅटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून त्यांना हात दाखवतो. जेव्हा माझ्या घरी पार्टी असते, मित्रपरिवार आणि माझे वडील येतात, तेव्हा मी त्यांच्यासोबत बाल्कनीत वेळ घालवतो. मी कामानंतर किंवा सकाळी लवकर मोकळा असताना, तेव्हा ताजी हवा घेण्यासाठी बाल्कनीमध्ये देखील जातो. त्याने स्वत:साठी खासगी सुरक्षारक्षक ठेवल्याचंही यावेळी सांगितलं.


'मला आणि माझ्या कुटुंबाला धमकावलं'


याआधी धमक्या मिळाल्याचंही सलमान खानने सांगितलं. यावर्षी जानेवारी महिन्यात दोन जणांनी त्याच्या पनवेलवरील फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना पकडलं, ते आरोपी बिश्नोईच्या गावचे रहिवासी होते. सलमान पुढे म्हणाला की, '2022 मध्ये माझ्या वडिलांना एक पत्र मिळाले होते, ज्यात मला आणि माझ्या कुटुंबाला धमकावण्यात आले होते आणि ते माझ्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बेंचवर ठेवण्यात आले होते. या प्रकरणी माझ्या वडिलांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.


अधिकृत ईमेलवर धमकीचा मेल


सलमानने सांगितलं की, मार्च 2023 मध्ये, माझ्या अधिकृत ईमेलवर एक मेल आला होता, ज्यामध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला धमकावण्यात आलं होतं. यानंतर माझ्या टीमने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. लॉरेन्स बिश्नोईप्रमाणे ही धमकी देण्यात आली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय?