मुंबई : जगातील सर्वात महागडं लग्न म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Mabani Radhika Merchant Wedding) यांचं लग्न, या लग्नात सुमारे 5000 कोटींचा खर्च आल्याचं सांगितलं जात आहे. हा शाहीविवाह सोहळा जगभरात चर्चेचा विषय ठरला. प्री-वेडिंग सेलिब्रेशनपासूनच हे लग्न खास आकर्षण बनलं होतं. आशियातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर तीन दिवस मुंबईत रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. पण हा लग्नसोहळा अजून संपलेला नाही. आता लंडनमध्ये अनंत-राधिकाच्या ग्रँड वेडिंग पार्टी पार पडणार आहे. या पार्टीची तयारी सुरु असून दोन महिन्यांसाठी 7 स्टार हॉटेलही बुक करण्यात आलं आहे.


अनंत-राधिकाच्या लग्नाचं सेलिब्रेशन आता लंडनमध्ये


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा अजून संपलेला नाही. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आता त्यांचा धाकटा मुलगा अनंत आणि सून राधिका यांच्यासाठी लंडनमध्ये एका भव्य सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी आलिशान 7 स्टार स्टोक पार्क हॉटेल बुक करण्यात आलं आहे. या ग्रँड पार्टीची सध्या जोरदार तयारी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. 


2 महिन्यांसाठी 7 स्टार हॉटेल बुक


लंडनमध्ये अनंत-राधिकाच्या ग्रँड वेडिंग पार्टीमध्ये हॉलिवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटी, जगातील आघाडीचे उद्योगपती, राजकीय व्यक्ती आणि अगदी ब्रिटिश राजघराणे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी सप्टेंबरपर्यंत लंडनमधील 7 स्टार स्टोक पार्क हॉटेल बुक केलं आहे. हॉलिवूड कलाकारांसह, प्रिन्स हॅरी आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन या पार्टीला उपस्थित राहू शकतात.


कुठे होणार ग्रँड वेडिंग पार्टी?


अनंत-राधिकाची ग्रँड वेडिंग पार्टी स्टोक पार्क इस्टेट येथे होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने ही मालमत्ता 2021 मध्ये 57 दशलक्ष पौंडांना भाडेतत्त्वावर घेतली होती. या ठिकाणी नूतनीकरण करण्यात आलं. लंडनच्या बाहेर, बकिंगहॅमशायर येथे असलेल्या स्टोक पार्क इस्टेटमध्ये हवेली, गोल्फ कोर्स आणि टेनिस कोर्ट यांचा समावेश आहे.


क्लब, गोल्फ कोर्स सर्वसामान्यांसाठी दोन महिने बंद


लंडनमध्ये असलेले हे स्टोक पार्क हॉटेल बऱ्याच दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असल्याचं वृत्त ब्रिटिश वृत्तपत्राने दिलं होतं. आता मुकेश अंबानी यांनी दोन महिन्यांसाठी हॉटेल बुक केलं असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इस्टेटच्या गोल्फ कोर्स क्लबच्या सुमारे 850 सदस्यांना सप्टेंबरपर्यंत क्लब बंद राहणार आहे. अंबानी कुटुंबाच्या या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर स्टोक पार्क इस्टेट आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Anant Radhika Wedding : जगातलं सर्वात महागडं लग्न, अनंत अंबानीच्या लग्नाचा राजेशाही थाट; 5000 कोटींचा खर्च