एक्स्प्लोर

अभिनेते प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढवणार

नववर्षाच्या सुरूवातीला आपण 2019 ची निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक न लढवता आपण अपक्ष ही निवडणूक लढणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती.

मुंबई : बॉलिवूड आणि विशेषत: दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नववर्षाच्या सुरूवातीला आपण 2019 ची निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक न लढवता आपण अपक्ष ही निवडणूक लढणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती. मी हिंदूविरोधी नाही, फक्त मोदीविरोधी आहे, असे प्रकाश राज यांनी म्हटले होते. मारेकऱ्यांचं समर्थन करणारा कुणीही व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ शकत नाही. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मोदी समर्थकांनी सेलिब्रेशन केलं. त्यावेळीही मोदींनी प्रतिक्रिया दिली नाही. एक खरा हिंदू कधीच अशा हत्यांचे समर्थन करणार नाही.”, असे प्रकाश राज यांनी म्हटले होते. प्रकाश राज यांनी अनेकदा सोशल मीडियावरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.   "मैने मांगा राशन, उसने दिया भाषण." या मिमच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी मोदींच्या भाषणांवर टीका केली होती. मोदी खोटे बोलतात, मीडिया खोट्या बातम्या पसरवते, मोदींच्या पक्षाचे प्रवक्ते खोट्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसतात, त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते मात्र या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, असेही ते म्हणाले होते. कर्नाटक निवडणुकीच्या आधी तिथे कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही, आल्यास ती कर्नाटकातल्या नागरिकांची घोडचूक असेल असं वक्तव्य प्रकाश राज केले होते. शिवाय मी काँग्रेसच्या समर्थनात नसून भाजपच्या विरोधात आहे असंही मत त्यांनी मांडले होते.

महत्त्वाच्या बातम्या

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Ashram web series: 'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Embed widget