Shah Rukh Khan : जनसेनाचे संस्थापक आणि अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. आंध्र प्रदेशमध्ये तो निवडणुकीचा प्रचार करत आहे. आता नुकतचं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिनेत्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) भाष्य केलं आहे. पवन कल्याणने किंग खानबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अभिनेता म्हणाला की,"पैशांसाठी मी चुकीच्या पद्धतीने जात नाही. मी माझ्या तत्त्वांशी सहमत आहे. शाहरुख खानपेक्षा जास्त पैसे ऑफर होऊनही मी एक जाहिरात केली नव्हती". 


"मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैसे ऑफर झाले होते" : पवन कल्याण


पवन कल्याण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणाला की, 2000 मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स तब्येतीसाठी योग्य नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला. कोला ब्रँडने मला सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करण्याची मोठी रक्कम ऑफर केली होती. पण मी यात काहीही रुची दाखवली नाही. मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैसे ऑफर झाले होते. माझे तत्त्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पैसे कमावण्यात मला काहीही रस नाही".


चिरंजीवीचा पवन कल्याणला पाठिंबा


दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीने एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या छोट्या भावासाठी मत मागताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणत आहे,"माझा छोटा भाऊ लोकांच्या मदतीसाठी त्याच्या पैशांचा वापर करत आहे. त्याला आशीर्वाद द्या. तर नानीनेदेखील पवन कल्याणला मत देण्यासाठी चाहत्यांना आव्हान केलं आहे".


शाहरुखच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या... (Shah Rukh Khan Upcoming Movies) 


एटली कुमार लवकरच 'जवान' चित्रपटाचं काम सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला जवान चित्रपट रिलीज होऊ शकतो. पठाण चित्रपटाचा सीक्वेल 2026 मध्ये प्रदर्शित होईल. शाहरुख खानच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  एकंदरीतच 2023 प्रमाणे 2025 आणि 2026 शाहरुख खान बॉक्स ऑफिस गाजवणार आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करण्यासाठी किंग खान सज्ज आहे. तसेच आर्यन खानच्या 'स्टारडम' या वेबसीरिजमध्येही शाहरुख खान दिसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. शाहरुख खानने सलग तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता त्याच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'किंग' चित्रपटात तो पहिल्यांदा लाडकी लेक सुहाना खानसोबत (Suhana Khan) स्क्रीन शेअर करताना दिसेल. 'द किंग' (The King) हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : आयपीएल सुरु असतानाच किंग शाहरुख खानचा सर्वात मोठा निर्णय; कारणही सांगितले