Salman Khan Property :  बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. मागील महिन्यात मुंबईतील सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागे बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय, सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या गदारोळात सलमान खानच्या संपत्तीची वाटणी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानच्या संपत्तीचे  चार हिस्से होऊ शकतात. 


मोस्ट एलिजेबल बॅचलर आहे सलमान


सलमान खानच्या संपत्तीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानची 4000 कोटी रुपयांची संपत्ती चार लोकांमध्ये विभागली जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांनी अरबाजच्या मुलाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सलमान खान हा एकटाच राहत असल्याचे म्हटले होते. 






सलमानच्या संपत्तीची अशी होणार वाटणी?


सलमान खान हा अविवाहित आहे. त्याशिवाय, त्याने कोणतेही मुलं दत्तकही घेतले नाही. त्यामुळे सलमानची संपत्ती कोणाच्या वाटेला जाणार, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. 'क्राइम तक' या पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या संपत्तीचे चार हिस्से होणार आहेत. हे चारही हिस्से कुटुंबातील लोकांमध्ये वाटले जाणार आहेत. 


सलमानच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार?


सलमान खानला अरबाज आणि सोहेलशिवाय अलविरा खान आणि अर्पिता खान या दोन बहिणी आहेत. या भावंडांमध्ये खूप प्रेम आहे. जर, दुर्देवाने सलमानला काही झाल्यास त्याच्या संपत्तीवर भाऊ आणि बहिणींचा अधिकार असल्याचे वृत्त आहे. तर, काही भाग सलमान खानची एनजीओ बिईंग ह्युमनला देणगी म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सलमान खान हा बिईंग ह्युमन या आपल्या एनजीओच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देतो. अनेकांना शस्त्रक्रिया, औषधोपचारासाठी त्याने मदत केली आहे.