Celebs Networth Who Joined Politics : मनोरंजनसृष्टी (Bollywood) आणि राजकारण (Politics) यांचं खूप छान नातं आहे. सध्या निवडणुकीचा धामधूम असून ग्लॅमरस विश्वातील अनेक कलाकारांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. काही सेलिब्रिटी आधीपासूनच राजकारणात आहेत. तर काहींनी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांचाही यात समावेश आहे. 'रामायण' फेम अरुण गोविल (Arun Govil) यांचाही यात समावेश आहे. राजकारणात नशीब आजमावणाऱ्या स्टार्समध्ये सर्वात श्रीमंत कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


अरुण गोविल (Arun Govil) : अभिनेते अरुण गोविल आलिशान आयुष्य जगले आहेत. अरुण गोविल यांच्याकडे 62.99 लाखांची मर्सिडीज कार आहे. तर अभिनेत्याची एकूण संपत्ती 5.67 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अरुण गोविल यांना 'रामायण' मालिकेमुळे चांगलीच ओळख मिळाली आहे. या मालिकेसह पहेली, सावन को आने दो, साँच को आंच नहीं, जिओ तो ऐसे जिओ, हिम्मतवाला, दिलवाला आणि गोविंदा गोविंदासारख्या चित्रपटांमध्ये अरुण गोविल यांनी काम केलं आहे.


दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) : दीपिका चिखलियाच्या करिअरमध्ये 'रामायण' मैलाचा दगड ठरला आहे. त्यावेळी दीपिकाला रामायणमध्ये काम करण्याचे 20 लाख रुपये मिळत होते. दीपिका चिखलिया 38 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीन आहे. 


कंगना रनौत (Kangana Ranaut) : कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडीमधून निवडणूक लढवत आहे. कंगना रनौतची एकूण संपत्ती 95 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी कंगना 15-20 कोटी रुपये आकारते. कंगना रनौत बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. कंगनाला बॉलिवूडची 'पंगाक्वीन' असेही म्हटले जाते. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कंगनाने काम केलं आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


रुपाली गांगुली (Rupali Ganguly) : अभिनेत्री रुपाली गांगुलीची एकूण संपत्ती 25 कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका एपिसोडसाठी अभिनेत्री तीन लाख रुपये आकारते. 


गुल पनाग : अभिनेत्री गुल पनागने 2014 मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 5-6 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 


काम्या पंजाबी (Kamya Punjabi) : काम्या पंजाबी काँग्रेसची सदस्य होती. मीडिया रिपोर्टनुसार काम्याची एकूण संपत्ती 10-12 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 


शेखर सुमन (Shekhar Suman) : 'हीरामंडी' या वेबसीरिजच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता शेखर सुमनने बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे. अभिनेत्याचा मुंबईत आलिशान बंगला आहे. अभिनेत्याची एकूण संपत्ती 20 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 


संबंधित बातम्या


Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 15 दिवसांपासून बेपत्ता, कुटुंबीय चिंतेत, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सवाल