Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये धमाकेदार कमबॅक केलं आहे. पाच वर्षांनी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाच्या माद्यमातून त्याने धमाकेदार कमबॅक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. 'पठाण'च्या काही महिन्यानंतर त्याचा 'जवान' (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'जवान' या चित्रपटाने 'पठाण'पेक्षा जास्त कमाई केली. तर वर्षाच्या शेवटी त्याचा 'डंकी' (Dunky) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानेदेखील चांगली कमाई केली. एका वर्षात तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर शाहरुखने आता मोठा निर्णय घेतला आहे. 


शाहरुख खानचा मोठा निर्णय


शाहरुख खान आता थोडा ब्रेक घेण्याचा विचार करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख खान सलग खूप काम करत आहे. सध्या तो आपली आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सला (IPL Team KKR) पाठिंबा दर्शवताना दिसत आहे. स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना शाहरुख खान म्हणाला,"सध्या मी कोणत्याही चित्रपटाचं शूटिंग करत नाही. ब्रेकवर आहे. आता आगामी चित्रपटाचं शूटिंग कदाचित जुन, जुलै किंवा ऑगस्टमध्ये मी सुरू करेल. सध्या तरी माझ्याकडे मोकळा वेळ आहे. त्यामुळे मी आयपीएल आनंदाने पाहतोय". 


शाहरुख खानचा आगामी चित्रपट कोणता? (Shah Rukh Khan Upcoming Movie)


शाहरुख खानने सलग तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता त्याच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. शाहरुख सध्या ब्रेकवर असून लवकरच तो बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. तसेच किंग चित्रपटातही तो झळकणार आहे. 'किंग' चित्रपटात तो पहिल्यांदा लाडकी लेक सुहाना खानसोबत (Suhana Khan) स्क्रीन शेअर करताना दिसेल. 'द किंग' (The King) हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे. 


शाहरुखच्या चित्रपटांचा सीक्वेल कधी येणार? 


एटली कुमार लवकरच 'जवान' चित्रपटाचं काम सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला जवान चित्रपट रिलीज होऊ शकतो. पठाण चित्रपटाचा सीक्वेल 2026 मध्ये प्रदर्शित होईल. शाहरुख खानच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  एकंदरीतच 2023 प्रमाणे 2025 आणि 2026 शाहरुख खान बॉक्स ऑफिस गाजवणार आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करण्यासाठी किंग खान सज्ज आहे. तसेच आर्यन खानच्या 'स्टारडम' या वेबसीरिजमध्येही शाहरुख खान दिसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.


संबंधित बातम्या


IPL 2024 : "तो आमचा जावईच"; विराट कोहलीसाठी शाहरुख खान असं का म्हणाला?