Paresh Rawal Corona Positive : अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचं आवाहन
बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेते आमिर खान, आर. माधवन आणि मिलिंद सोमणलाही कोरोना झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. त्याचसोबत आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आपली तपासणी करुन घेण्याचं आवाहनही परेश रावल यांनी केलं आहे.
शुक्रवारी रात्री ट्वीट करुन परेश रावल यांनी माहिती दिली की, "दुर्दैवानं, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 10 दिवसांपासून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी स्वतःची तपासणी करुन घ्यावी."
यापूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानलाही कोरोनाची लागण झाली होता. आमिर खानच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. एबीपी न्यूजला आमिर खानच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "आमिर खान कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ते सध्या आपल्या घरातच होम-क्वारंटाईन झाले आहेत आणि सर्व नियमांचं पालन करत आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ज्या कोणी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी सर्वांचे आभार." महत्त्वाची गोष्ट म्हणजे की, गेल्या वर्षी आमिर खानसोबत काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.
'थ्री इडियट्स'मधल्या 'रँचो'नंतर 'फरहान'लाही कोरोनाची लागण; मिलिंद सोमणही कोविड पॉझिटीव्ह
कोरोनाची दुसरी लाट बॉलिवूडकरांसाठी चिंतेची गोष्ट झाली आहे. पहिल्या लाटेतून वाचलेल्या अनेक कलाकारांना दुसऱ्या लाटेने मात्र तडाखा दिला आहे. 'थ्री इडियट्स' चित्रपटातील 'रँचो'ला म्हणजेच आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले. त्यानंतर आता लगेचत 'थ्री इडियट्स'मधल्या 'फरहान'लाही म्हणजेच अभिनेता आर. माधवनलाही कोरोनाची लागण झाली आहे. आर. माधवनपाठोपाठ मिलिंद सोमणनेही (Milind Soman) त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मिडियावर दिली आहे. मिलिंद सोमणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला क्वॉरंटाईन केले आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Updates | 'थ्री इडियट्स'मधल्या 'रँचो'नंतर 'फरहान'लाही कोरोनाची लागण; मिलिंद सोमणही कोविड पॉझिटीव्ह
- Aamir Khan Corona Positive: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण