Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबद्दलच्या (Maratha Reservation) पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलं होतं, "जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.' आता आरक्षणाबद्दल आणखी एक पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे की, 'आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे त्वरित थांबवा'


किरण माने यांची पोस्ट


किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "मराठा बांधवांनो...आपल्या महामानवांनी कधीही दूसर्‍या समाजाला कमी लेखलं नाही. तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये बुद्धाला पाहिलं. छ. शिवरायांनी सिद्दी इब्राहीमला अंगरक्षक पद दिलं. शाहूराजांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडवला! आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे किंवा भावनेच्या भरात कुणाची तुलना असामान्य महामानवांसोबत करून कटुता आणणे या गोष्टी त्वरित थांबवा. आपली लढाई स्वबळावर लढुया, कुणाला कमी लेखून नाही." किरण माने यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्याबाबत देखील पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं,"जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं. कारण व्सवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणाऱ्या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं महान कार्य तुम्ही करत आहात. तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे". 


किरण माने हे साताऱ्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होता.


किरण माने यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता.  तसेच त्यांनी  “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या  अभिमान साठे ही भूमिका साकारली. किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. 


संबंधित बातम्या: 


Kiran Mane : "जरांगे पाटलांच्या धैर्याला अन् चिकाटीला सलाम"; किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट