Hina Khan  : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान नेहमी सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते. आतही तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. लेटेस्ट फोटोमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. 


नुकतेच हिना खानने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिनाने निऑन टॉप आणि लेगिंग्ज परिधान केल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये हिना खान योगा मॅटवर बसून सिझलिंग पोज देत आहे. यामध्ये हिना खानचा अतिशय आकर्षक लूक पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करताना हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आरोग्य ही संपत्ती आहे.'


हिना खानचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हिना खानच्या या फोटोंना तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरून तिच्या फोटोला चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज येतो. फोटोंमध्ये हिना खान मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे. हिना खानचा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिनाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.






 हिना खान तिच्या शानदार अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते. हिना किती फिटनेस फिट आहे याचा अंदाज तिचे फोटो पाहून येऊ शकतो. हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात ये रिश्ता क्या कहलाता है या शोमधून केल्याची माहिती आहे. या शोमध्ये अक्षराची भूमिका साकारून तिने लोकांची मने जिंकली.


महत्वाच्या बातम्या