Aashutosh Gokhale : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दीपा आणि डॉक्टर कार्तिकची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली आहे. छोट्याशा कार्तिकी आणि दीपिकाने मालिकेत नवा ट्विस्ट तर आणलाच, पण आपल्या गोड निरागस अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा देखील मिळवली.
मालिकेच्या सेटवरची धमाल देखील कलाकार सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, आता या सेटवरून काहीशी वाईट बातमी समोर आली आहे. या मालिकेत ‘डॉ. कार्तिक इनामदार’ साकारणाऱ्या अभिनेता आशुतोष गोखलेच्या (Aashutosh Gokhale) पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आशुतोषने स्वतः सोशल मीडिया पोस्टमधून याची माहिती दिली आहे. पायाला दुखापत झाली असली तरी, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून ब्रेक घेणार नसल्याचे त्याने म्हटले आहे.
मालिका टीआरपी शर्यतीत अव्वल
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल आहे. या मालिकेतील सतत बदलते ट्रक आणि कथेतील ट्विस्ट मालिकेची रंगत वाढवत आहेत. शिवाय यातील कलाकारांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. छोट्याशा कार्तिकी आणि दीपिकाच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.
एका मध्यमवर्गीय घरातील उपेक्षित आणि सावळ्या रंगाच्या दीपा या मुलीची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत तिने नेहमीच यश मिळवले आहे. आता मालिकेत दीपा टीकहा नवा व्यवसाय सुरू करणार असून, यात तिला सौंदर्याची साथ मिळणार, असे कथानक दाखवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
- Kishori Shahane : अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या कारचा अपघात, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
- Suhana Khan : एक लाखाची बॅग अन् दोन लाखांचे शूज, सुहाना खानच्या कॅज्युअल लूकमध्येही लक्झरी!
- Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha