Kishori Shahane : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांच्या कारचा अपघात झाला आहे. पुण्यातील मावळमध्ये ही घटना झाली आहे. अपघातातून सुखरुप बचावल्यानंतर किशोरी शहाणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
अपघातानंतर किशोरी शहाणेंची भावूक पोस्ट
अपघातानंतर किशोरी शहाणेंनी भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, "आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…".
किशोरी शहाणे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. किशोरी शहाणे यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते आहे. त्यांच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांची खूप काळजी वाटत असल्याचे दिसते आहे.
संबंधित बातम्या
Suhana Khan : एक लाखाची बॅग अन् दोन लाखांचे शूज, सुहाना खानच्या कॅज्युअल लूकमध्येही लक्झरी!
Khiladi : रवी तेजाचा 'खिलाडी' 11 फेब्रुवारीला हिंदीतही होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha