Lata Mangeshkar : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त होत आहे. लतादीदींच्या निधनाने संगीतप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लतादीदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. लता दीदींनी 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गाणे गायले होते. हे गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनादेखील अश्रू अनावर झाले होते. 


'ऐ मेरे वतन के लोगो' हे देशभक्तीपर गीत प्रत्येक भारतीयाला आवडते. हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिलेले असून सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. तर लतादीदींनी हे देशभक्तीपर गीत गायले आहे. हे गीत 1962 च्या चिनी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आले होते. आजही राष्ट्रीय कार्यक्रमात देशभक्ती जागृत ठेवण्यासाठी हे गीत लावले जाते. तर आजच कवी प्रदीप यांची जयंती आहे. 


विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लतादीदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात तशी 1942 मध्ये झाली. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. मात्र त्या आधी 1938 साली त्यांनी सोलापुरात पहिल्यांदा गायन केलं होतं. 


कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी मध्यप्रदेशातील बडनगरमध्ये झाला होता. तर 11 डिसेंबर 1998 मध्ये मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1940 साली प्रदर्शित झालेल्या बंधन सिनेमामुळे कवी प्रदीप लोकप्रिय झाले. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar : जेव्हा पु. ल. देशपांडे लता मंगेशकरांचे भरगच्च कार्यक्रमात कौतुक करतात...


Lata Mangeshkar: लतादीदींच्या आवाजानं जंगलात गुरे देखील शांततेत चारा खात होती...! 


Lata Mangeshkwar Passes Away : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha