एक्स्प्लोर
अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा, गर्लफ्रेण्डला मुलगा झाला
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डिमेट्रिअॅड्स यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. गॅब्रिएलाने काल (गुरुवार, 18 जुलै 2019) मुलाला जन्म दिला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेण्ड, दक्षिण आफ्रिकन सुपरमॉडेल-अभिनेत्री गॅब्रिएला डिमेट्रिअॅड्स यांना मुलगा झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांची कन्या निधी दत्ताने याबाबत ट्विटरवरुन घोषणा केली. हिंदुजा रुग्णालयात गॅब्रिएलाने बाळाला जन्म दिल्याची माहिती आहे.
गॅब्रिएला हिला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी अर्जुन आणि त्याच्या मुली महिका-मायरा हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आल्याचे फोटोही सोशल मीडियावर वायरल झाले होते. महिका आणि मायरा यांनी गॅब्रिएलाला कुटुंबात स्वीकारल्याचं अर्जुनने याआधीच सांगितलं होतं.
गॅब्रिएलाच्या डिलीव्हरीसाठी तिचे पालकही काही दिवसांपूर्वीच मुंबईला आले होते. अर्जुन रामपालने आपण तिसऱ्यांदा वडील होणार असल्याचं एप्रिल महिन्यात जाहीर केलं होतं.
बॉलिवूडमधले नातेसंबंध सामान्य माणसांना समजण्यापलिकडचे असतात, असं म्हणतात ते चुकीचं नाही. अर्जुन रामपाल मेहर जेसियापासून घटस्फोट घेण्याआधीच त्याची प्रेयसी प्रेग्नंट राहिली. अर्जुन रामपालची विभक्त पत्नी पुरवणार 'नवऱ्याच्या बायको'चे डोहाळे अर्जुन आणि मेहर 1998 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. वीस वर्षांच्या संसारानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. अर्जुन रामपाल आणि दक्षिण आफ्रिकन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएला डिमेट्रिअॅड्स बऱ्याच काळापासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते. गॅब्रिएला 'सोनाली केबल' या चित्रपटात दिसली होती. मेहर जेसिया 1986 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेची मानकरी ठरली होती. नुकतंच तिने भावंडं आणि मित्रांच्या मदतीने इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात उडी घेतली आहे. तिच्या कंपनीला गॅब्रिएलाच्या 'बेबी शॉवर'चं काँट्रॅक्ट देण्यात आलं होतं. गेल्या वर्षी अर्जुनसाठी गॅब्रिएलाने बर्थडे पार्टी आयोजित केली होती. तेव्हाही मेहरने तिला काही आयडियाज सुचवल्या होत्या.Congratulations @rampalarjun on the arrival of your bundle of joy! God bless! ❤️ pic.twitter.com/vWsPGMfLGY
— Nidhi Dutta (@RealNidhiDutta) १८ जुलै, २०१९
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement