एक्स्प्लोर

अरबाज खान दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार?

गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत अरबाज खान लगीनगाठ बांधणार असल्याचं बोललं जातं.

मुंबई : सुपरस्टार सलमान खानचा धाकटा भाऊ, अभिनेता अरबाज खान पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे. गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत अरबाज लगीनगाठ बांधणार असल्याचं बोललं जातं. मॉडेल-अभिनेत्री मलायका अरोरासोबत 18 वर्षांच्या संसारानंतर अरबाज खान 2017 मध्ये विभक्त झाला होता. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज यांच्यातील मैत्री कायम आहे. खान कुटुंबांतील सोहळ्यांना ती अनेकदा उपस्थिती लावते. अरबाजला जॉर्जियासोबत लग्न करण्याची इच्छा आहे, मात्र खान कुटुंबाची तिला पसंती नसल्याचं म्हटलं जातं. अरबाजला इतक्या वर्षांत स्वतःची ओळख निर्माण करता न आल्यामुळे मलायका नाराज होती, असं खान कुटुंबीयांना वाटत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी अरबाज रोमानियन वंशाच्या अॅलेक्झांड्रा कॅमेलियाला डेट करत असल्याचं समोर आलं होतं. अरबाजच इन्स्टाग्रामवर तिच्यासोबत फोटो शेअर करत असे. अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली काही महिन्यांपूर्वी दिली होती. अरबाजच्या याच सवयीमुळे अरबाज-मलायकामध्ये वितुष्ट आल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय कपूरच्या घरी झालेल्या पार्टीला अरबाज-जॉर्जिया एकत्र आले होते. यावेळी मलायकाची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोराही हजर होती. तिघांचे आनंदी फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले. संबंधित बातम्या  आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची अरबाज खानची कबुली  मलायकापासून वेगळं झाल्यानंतर अरबाज कोणाला डेट करतोय?  18 वर्षांचा संसार मोडला, अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट “मलायकावर खूप प्रेम करतो, तिला गमावण्याची भीती वाटते”  

महत्त्वाच्या बातम्या

Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget