एक्स्प्लोर
आराध्याला ट्रोल करणाऱ्या ट्विटराईटला अभिषेकने झापलं
ऐश्वर्या राय बच्चनने आराध्यासह मंगळुरुत एका लग्नाला हजेरी लावली होती. यावर अभिषेकला उद्देशून शेरीन पताडियन या महिलेने ट्वीट केलं.
मुंबई : वडील आपल्या लेकीच्या बचावासाठी काही करु शकतात, हे रील आणि रिअल लाईफमध्ये अनेकदा पाहायला मिळतं. ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेकही याला अपवाद नाही. ट्विटरवर आराध्याला ट्रोल करणाऱ्या एका महिला यूझरला अभिषेक बच्चनने खडे बोल सुनावले आहेत.
सोशल मीडियावरील टिवटिवकडे काही सेलिब्रेटी दुर्लक्ष करतात. अभिषेकने मात्र यापूर्वीही आराध्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाणा साधणाऱ्या ट्विटराईटला झापलं होतं.
@shirjahan या ट्विटर यूझरने सोमवारी आराध्याचा संदर्भ देत एक ट्वीट केलं. ऐश्वर्या राय बच्चनने आराध्यासह मंगळुरुत एका लग्नाला हजेरी लावली होती. यावर अभिषेकला उद्देशून शेरीन पताडियन या महिलेने ट्वीट केलं.
काय आहे ट्वीट?
'@juniorbachchan, तुमची मुलगी शाळेत जात नाही का? आईसोबत हवं तेव्हा ट्रीपला जाण्याची परवानगी कोणती शाळा देते, याचं मला नवल वाटतं. की तिला ब्यूटी विदाऊट ब्रेन करण्याचा तुमचा इरादा आहे. सारखी उद्धट आईच्या हातात हात घालून फिरत असते. तिला सामान्य बालपण मिळतच नाहीये' विशेष म्हणजे इंग्रजीत केलेल्या या ट्वीटमध्ये व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. अभिषेकने झापल्यानंतर मात्र शेरीनने तिचं मूळ ट्वीट डीलिट केलं आहे.
@juniorbachchan is ur child not going to school? I do wonder What school gives permission to take a out a kid when u like to go a a trip with mom. Or are u guys going for beauty without brains. Always hand in hand with a arrogant mom. Not having a normal childhood
अभिषेकचं कूल उत्तर
अभिषेकने मात्र कोणाताही आकांडतांडव न करता शांतपणे उत्तर दिलं आहे. 'मॅम, माझ्या माहितीनुसार बहुतांश शाळा शनिवार-रविवार बंद असतात. त्यामुळे ती आठवड्याचे इतर पाच दिवस (वीकडेज) शाळेत जाते. तुमच्या ट्वीटमधले स्पेलिंग्ज बघता, तुम्ही याबाबत (शाळेत जाण्याबाबत) विचार करायला हरकत नाही'
https://twitter.com/juniorbachchan/status/937653533972709376
महिलेचा पुन्हा रिप्लाय
आराध्याचे सामान्य मुलांसारखे फोटो तुम्ही पोस्ट करायला हवेत, सारखे तिच्या आईच्या कडेवर असतानाचे फोटो नको, असा रिप्लाय तिने केला.
A yeah the spelling?Any thanks for the response . Most people think it but don’t have the guts say something. Maybe u guys should post some pictures of her as normal kid and not one always hanging on her moms arm
काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील. मी भारतातील नाही आणि शाळा बंद आहेत, हे मला माहित नव्हतं, असंही ट्वीट शेरीनने केलं.
May a few typing mistakes. I’m not from India so in didn’t know the school are closed. Anyways thanks for u reply. ??
विशेष म्हणजे, अभिषेकच्या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
yदोन वर्षांपूर्वीही एका ट्विटराईटने अभिषेक आराध्याचा फोटो ट्वीट करुन खिल्ली उडवली होती. 'आराध्याने मोठं होऊन तिच्या बाबांचे द्रोणा आणि झूम बराबर झूम सारखे सिनेमे पाहावे आणि काय मजबुरी होती? असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्याची वाट बघतोय' असं लिहिलं होतं. त्यावर माझे सिनेमे आवडत नसतील, तर मला सांग, आराध्याला मध्ये खेचण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement