Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या कार्यक्रमातील काही स्पर्धकांचा खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र काही स्पर्धकांनी प्रेक्षकांना नाराज केलं आहे. त्यामुळे निर्मात्यांनीदेखील नाराज करणाऱ्या स्पर्धकांना 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अशातच आता या पर्वात अब्दू रोझिकची (Abdu Rozik) एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे.


'बिग बॉस 17'चा शनिवारचा भाग खूपच नाट्यमय होता. सलमान खान आणि घरातील पाहुण्यांसमोर स्पर्धकांनी ड्रामा केलेला पाहायला मिळाला. एका टास्कदरम्यान खानजादी (Khanzaadi) म्हणाली की,"तिच्या आजारपणाची मजा घेतली जात आहे".  त्यामुळे तिला आता घरी जायचं आहे. अशातच अब्दू रोझिकच्या एका पोस्टने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


अब्दू रोझिकची पोस्ट काय? (Abdu Rozik Post)


अब्दू रोझिकने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर अब्दूची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अब्दूने खानजादीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"खानजादी तू चांगली खेळ...मी तुला पाठिंबा देण्यासाठी येत आहे". दुसऱ्या एका फोटोमध्ये अब्दूने पुष्पगुच्छ असलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"खानजादीला चिअर करण्यासाठी हे आहे".



अब्दू रोझिक 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी झाला होता. अब्दूचा गोंडसपणा आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) सोबतच्या त्याच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या कार्यक्रमामुळे अब्दूचा मोठा चाहतावर्ग बनला होता. तसेच सलमान खानचाही तो लाडका होता. भाईजानच्या सिनेमात अब्दूच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 'बिग बॉस 17'चा स्पर्धक नावेद सोलने घरातून बाहेर पडल्यानंतर सांगितलं होतं की,"अब्दू रोझिकच्या सांगण्यावरुन मी 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली होती". 


'बिग बॉस 17'मधील जिग्ना वोराचा प्रवास संपला


'बिग बॉस 17'मधील जिग्ना वोराचा (Jigna Vora) प्रवास संपला आहे. जिग्ना वोरा 'बिग बॉस 17'च्या घरातून बाहेर पडणारी चौथी स्पर्धक आहे. जिग्ना वोराआधी सोनिया बंसल, मनस्वी ममगई आणि नाविद सोल या स्पर्धकांनी 'बिग बॉस 17'च्या घरातून एक्झिट घेतली आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर, बिग बॉसच्या घरात 'अर्चना' प्रेग्नेंट? जाणून घ्या रिपोर्ट काय सांगतो