Janhvi Kapoor Dance Video:  सध्या सोशल मीडियावर  ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani)  उर्फ ओरीची (Orry) चर्चा होत आहे. ओरी हा बिग बॉसच्या घरात देखील गेला आहे.ओरी हा सोशल मीडियावर विविध अभिनेत्रींसोबतचे फोटो शेअर करतो. अशातच आता ओरीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


"पिंगा गं पोरी" गाण्यावर ओरी आणि जान्हवीचा डान्स


बाजीराव मस्तानी या चित्रपटातील "पिंगा गं पोरी" या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ ओरीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो जान्हवी कपूरसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी ही व्हाईट ड्रेस, पिवळी ओढणी आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे तर ओरी हा ब्लू पँट आणि रेड टीशर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


अनेक नेटकऱ्यांनी जान्हवी आणि ओरीच्या डान्सच्या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. "ब्रो हृतिक रोशनसारखा डान्स करतो", अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली आहे.  शिखर पहाडियानं देखील जान्हवी आणि ओरीच्या या डान्स व्हिडीओला कमेंट केली आहे. 'खिलौना बना खलनायक.' अशी कमेंट शिखरनं जान्हवी आणि  ओरीच्या डान्सच्या व्हिडीओला केली आहे. शिखर हा जान्हवीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे.


पाहा व्हिडीओ






कोण आहे ओरी?


ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. या फोटोमध्ये ओरी आणि बॉलिवूडमधील कलाकार दिसतात. सध्या ओरी हा बिग बॉलमुळे चर्चेत आहे.ओरीची गेल्या काही दिवसांपासून सोशल चर्चा होत आहे. ओरी नेमकं काय काम करतो? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? या सर्व गोष्टींबाबत जाणून घेण्यास नेटकरी उत्सुक होते. काही दिवसांपूर्वी  एका मुलाखतीमध्ये ओरीनं त्याच्या कामाबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला,"तुम्ही नोकरीसाठी जात असाल तर, तुम्ही नोकरदार आहात. तुम्ही चित्र काढत असाल तर, तुम्ही चित्रकार आहात. तसेच मी  जगत आहे, त्यामुळे मी एक लिव्हर आहे."


जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट


जान्हवी कपूरचा   'बावल' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला.आता जान्हवी ही 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जान्हवीसोबतच राजकुमार राव देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.   'देवरा' आणि 'उलज' या आगामी प्रोजेक्टमधून देखील जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या:


Orry:"भाई तू नक्की काय काम करतो?"; अभिनेत्रीला कायम चिकटून असणाऱ्या 'ओरी' नं अखेर सांगूनच टाकलं