Bigg Boss 17 Ankita Lokhande Pregnancy Test Report : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात ती पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली होती. पण गेल्या काही दिवसांत 'बिग बॉस 17'चं टीआरपी वाढवण्यात अंकिताचा मोठा वाटा आहे. 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट झाली होती. आता याप्रकरणातील रिपोर्ट समोर आले आहेत. 


अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे 'बिग बॉस 17'मधील लोकप्रिय जोडपं आहे. 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात ते नेहमीच एकमेकांबाबत तक्रार करताना दिसत असतात.  पण गेल्या काही दिवसांत अंकिताची तब्येत खालावली होती. त्यानंतर तिची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. अंकिताने स्वत: या संदर्भात खुसाला केला होता. अंकिता आणि विकीचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर


अंकिता लोखंडेची गेल्या आठवड्यात प्रेग्नंसी टेस्ट झाली होती. त्यानंतर अंकिता लगेचच 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण प्रत्यक्षात मात्र असे काहीही होणार नाही. अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अंकिता लोखंडे सध्यातरी आई होणार नाही.


टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेच्या सर्व टेस्ट झाल्या आहेत. आता अभिनेत्रीचे प्रेग्नंसी रिपोर्ट समोर आले असून ते निगेटिव्ह आहेत. अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी जिग्ना वोरा आणि रिंकू धवन यांच्यासोबत बोलताना आपल्या प्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर जिग्ना आणि रिंकू अभिनेत्रीची मजा घेताना दिसून आले होते. 


'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सुरू होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. या पर्वात चर्चेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये अंकिताचा समावेश होतो. 'बिग बॉस 17'च्या अनेक भागांमध्ये अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत दिसून आली आहे. विकीला 'मास्टर माइंड' हा टॅग मिळाला आहे. पण अंकिताचा खेळ मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकी वेगवेगळे खेळताना दिसत आहेत. 


'बिग बॉस'च्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट


'बिग बॉस 17'च्या चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडेचा समावेश होतो. कधी प्रेग्नंसी तर कधी सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्री चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती पती विकाला सांगत होती की,"सध्या मी खूप कन्फ्यूज आहे. माझी प्रेग्नंसी टेस्ट देखील झाली आहे.   प्रेग्नंसी टेस्टसह ब्लड टेस्ट आणि यूरिन प्रेग्नंसी टेस्टदेखील झाली आहे. मला पाळीदेखील आलेली नाही. मी खरचं प्रेग्नंट आहे की नाही हे मला माहिती नाही. पण आता मला घरी जायचं आहे". 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीची बातमी खरी? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेल्या सदस्याचा खुलासा